Barshi court gives life sentence to husband in wife murder case 
सोलापूर

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; प्रियेसीसोबत विवाह करण्यासाठी केला होता खून 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : प्रेयसीसोबत विवाह करण्यासाठी नवविवाहित पत्नीचा खून करुन जबरी चोरीचा बनाव केला व चोरट्यांनी मारहाण केल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर पतीनेच खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पती महेश भारत मिसाळ (रा. पुणे) यास येथील जिल्हा सत्र विशेष न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

मनिषा पिसाळ (रा. कोंबडवाडी, ता. उस्मानाबाद) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून 2 जानेवारी 2018 रोजी मनिषाचे वडील फुगारे यांनी पांगरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. ही घटना पाथरी तलावाजवळ घडली होती. मनिषाचा विवाह 7 मे 2017 रोजी महेश मिसाळ (रा. खामसवाडी, ता. उस्मानाबाद) याच्याशी झाला होता. मृत्यूसमयी ती चार महिन्यांची गरोदर होती. महेश हा पुण्यात कामास होता. त्यामुळे लग्नानंतर दोघेही पुण्यास रहावयास गेले. लग्नानंतर काही दिवसांनी तिला आपला पती सतत एका महिलेशी फोनवर बोलत असल्याचे लक्षात आले. त्याबाबत मनिषाने आपल्या माहेरी कल्पना दिली होती. 2 जानेवारी 2018 रोजी अचानक सकाळी साडेदहाला महेश पत्नीसह सासुरवाडीला आला. मात्र तेथे न थांबता तो लगेच पत्नीला घेवून बार्शी तालुक्‍यातील पाथरी येथील बहिणीकडे गेला. संध्याकाळी येतो म्हणून फोन आल्यानंतर काही वेळाने दोघांचेही फोन लागत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे आपल्या नातेवाईकांसह त्यांना शोधण्यासाठी निघाल्यानंतर रात्री येरमाळ्याजवळ चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत मनिषाचा मृत्यू झाल्याचे महेशने सांगितले. पांगरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर महेश मिसाळ याने आपले प्रेमसंबध असून त्या महिलेशी विवाह करण्यासाठी मनिषाचा खून केल्याची कबूली दिली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य तपास केल्याने व त्याचे प्रेमसंबध असल्याचे उघड झाल्याने न्यायालयाने महेश मिसाळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे ऍड. शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिले. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT