POCSO eSakal
सोलापूर

Barshi Crime : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन छ्ळ; तरुणावर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल

बार्शी शहरातील अल्पवयीन मुलगी शाळेत व खासगी ट्युशन क्लासेसला सायकलवर जात असताना तिचा पाठलाग करुन तिचेशी लज्जास्पद वर्तन केले.

सकाळ वृत्तसेवा

बार्शी - शहरातील अल्पवयीन मुलगी शाळेत व खासगी ट्युशन क्लासेसला सायकलवर जात असताना तिचा पाठलाग करुन तिचेशी लज्जास्पद वर्तन केले. दरम्यान, पालकांनी त्यास रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात देताच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) व इतर कलमांनुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली आहे.

विठ्ठल ज्योर्तिलिंग गोसावी (रा. सोलापूर रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकाने फिर्याद दाखल केली ही घटना सकाळी १ जुलै रोजी साडेअकराच्या दरम्यान घडली.

पालकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल शुक्रवारी (ता. ३०) रोजी मुलगी घरामध्ये शांत बसली होती त्यावेळी तिला तुला असे का होत आहे, घाबरल्यासारखं का वागते विचारताच मुलीने पालकांना माहिती सांगितली.

शाळा सुरु होण्यापूर्वी शाळेजवळ व खासगी ट्युशन क्लासेसला मी सायकलवरुन जात असताना माझ्या सायकल पाठिमागे एक जण दुचाकीवर पाठलाग करतो, वाहन आडवे लावतो, आणि तु मला आवडते, तू मला बोलत नाहीस असे बोलतो, मला त्याची खूप भीती वाटते असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पालकांनी सापळा रचून शनिवार (ता. १) रोजी अल्पवयीन मुलगी साडेअकरा वाजता शाळेतून घरी परत येत असताना, तरुणाला दुचाकीवरुन पाठलाग करताना रस्यावरच पकडले. व मुलीने सांगितले हा मागील पंधरा दिवसांपासून त्रास देत आहे. पालकांनी त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तपास पोलिस हवालदार सिंधू देशमूख करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT