Korona.jpg 
सोलापूर

दंड वसुलीत बार्शी अव्वल तर माढा मागे  कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांकडून साडेसात लाख रुपायांची वसुली : उपअधिक्षक अभिजित धाराशिवकर यांची माहिती 

कुलभुषण विभुते

वैराग (ता. बार्शी) : मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टगिंग न पाळणे अशा नियम मोडणाऱ्या लोकांवर पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. गेली वीस दिवसात कोरोना विषाणू प्रतिबंध उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या पाच पोलिस स्टेशन अंतर्गत 1 हजार 710 लोकांवर कारवाई करीत 7 लाख 54 हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी वैराग येथे बोलताना दिली . 

22 फेब्रुवारी ते 12 मार्च अखेर बार्शी उपविभागामध्ये बार्शी शहर पोलिस स्टेशनने 777 जणांवर कारवाई करीत 3 लाख 72 हजार 600 रुपये दंड वसूल करून सर्वाधिक कारवाई केली आहे. तर सर्वात कमी माढा पोलिस स्टेशनने 149 जणांवर कारवाई करीत 56 हजार 600 रुपये दंड वसूल केला आहे. पांगरी पोलीस स्टेशनने 312 जणांवर कारवाई करीत 1 लाख 7 हजारांची दंडात्मक कारवाई करीत दोन क्रमांकाची कारवाई ठरली. वैराग पोलिस स्टेशनने 259 जणांवर कारवाई करीत 1 लाख 4 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला तर बार्शी तालुका पोलिस स्टेशनने 213 जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 1 लाख 3 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिलेल्या आदेशावरून बार्शी उपविभागातील पोलीस ठाणे अंतर्गत 22 फेब्रुवारी ते 12 मार्चअखेर पर्यंत कारवाई केल्याची महिती पोलिस उपअधीक्षक धाराशिकर यांनी पत्रकारांना दिली. यापुढे नियम कोरोना विषाणू नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा उपअधिक्षकांनी बोलताना दिला आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

महाकुंभामध्ये व्हायरल झालेली मोनालिसा भोसलेला जीवे मारण्याच्या धमक्या; व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT