sakal
सोलापूर

बार्शीला पावसाने झोडपले; परिसरात नदी नाल्यांना पूर

पावसाळा हंगामातील पहिला मुसळधार पाऊस मानला जात आहे.

बाबासाहेब शिंदे

पांगरी : (ता.बार्शी) भागात रात्रीच्या बारा वाजेपासून पाऊस सुरूवात होऊन अधूनमधून मुसळधार पाऊसाने सकाळी सहा वाजेपर्यंत झोडपून काढले. परिसरातील सर्व नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा काही काळासाठी संपर्क तुटला होता. एकंदरीत यावर्षीच्या पावसाळा हंगामातील पहिला मुसळधार पाऊस मानला जात आहे. या रात्रीच्या वेळी अचानक आलेल्या पावसाने काढून पडलेले सोयाबीन, उडीद पिकास फटका बसला आहे. तर अनेक ठिकाणाचे काढणीस आलेले सोयाबीन पाण्यात गेले आहेत. शेतास तळ्याचे स्वरूप आलेले दिसून येत होते.

यावर्षीच्या पावसाळा हंगाम अधूनमधून रिमझिम पावसाबरोबर जोरदार सरी पडत गेल्या होत्या. त्यामुळे जेमतेम ओलावा निर्माण झाला होता. मात्र कोठे ही खव्याचे पाणी साठून राहिले नव्हते. नदी नालांना पूर आला नव्हता. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाई सामना करावा लागणार अशी भिती निर्माण झाली होती.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होऊन रिमझिम पाऊस पडत होते. या भागात एकतरी दमदार पाऊसाची गरज भासत असताना आज(ता.25)बारा वाजेच्या सुमारास पावसाने सुरूवात केली. त्यात अधूनमधून जोरदार पाऊस सकाळपर्यत कोसळत राहिला गेला. त्यामुळे नदी नालांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क काही काळपर्यत तुटला होता.

उक्कडगाव येथील नागोबा नदीला पूर आल्याने पांगरीकडे येणार्याचा संपर्क तुटला होता.दुपारपर्यत ही पूराचे पाणी कमी न झाल्याने लोकांना पांगरीकडे ये-जा करता आली नाही. येरमाळाकडे जाण्यासाठी मोती खाण नदीला मोठ्याप्रमाणात पूराचे पाणी आल्याने त्या बाजूचा ही संपर्क तुटला होता. यावेळी शेतातील गोठ्यावर धारा काढण्यास,पावसाने नुकसान काय झाले हे पाहण्यास मोती खाण नदीतून दोरीच्या सहाय्याने शेतकरी शेतात पोहचले.

पांढरी येथील पाझर तलावाचे साठवण तलाव रूपांतर झाल्याने उंची वाढविण्याचे काम चालू आहे.त्यामुळे तलावात सध्या पाणी साठून राहत नाही.या तलावात वडगाव,चोराखळी परिसरातून मोठ्याप्रमाणात पाणी येत असल्याने नदी मोठ्याप्रमाणात पाणी आले होते.त्यामुळे  काही काळ पुरामुळे नागरिकांचा संपर्क तुटला होता.

घोळवेवाडी येथील नीलकंठा नदी पूर आल्याने संपर्क तुटला होता. चिंचोली येथील नीलकंठा नदीवरील सर्व बंधारावरून पाणी वाहिले आहे. दोन वर्षापुर्वी पाणी फौंडेशनच्या कामात निर्माण केलेल्या खड्ड्यात,चरीमध्ये पाणी साठून राहिले आहे. त्यामुळे पुढील काळातील पाणीटंचाई संकट काही अंश तरी कमी होण्यास मदत होणार आहे.

या दमदार पावसाने शेतकर्यामधून समाधान व नाराज या गोष्टीना तोंड द्यावे लागले आहे.या भागात पहिलाच दमदार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत आहे तर काढणीस व काढलेले सोयाबीन पिकांस फटका बसल्याने नाराज सूर निघत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dams Water Level : पुणेकरांसाठी मोठी बातमी! चारही धरणे 100% भरली; पण आज 'या' भागात पाणीच नाही

Farmer Accident Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अपघात सुरक्षा योजनेत आता संपूर्ण कुटुंबाला संरक्षण, 2031 पर्यंत मुदतवाढ

Mumbai Local Train Viral Video : माथेफिरुने रोखली लोकल ट्रेन, धाडसी प्रवाशामुळे टळली मोठी दुर्घटना; रुळांवरचा थरार कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Gold Rate Today: RBI च्या निर्णयानंतर ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?

Kolhapur Flood: हिप्परगी, आलमट्टीत पाणी साठ्याचे निकष धाब्यावर; ‘आंदोलन अंकुश’च्या पाहणीत स्पष्ट, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महापुराचे संकट

SCROLL FOR NEXT