ad prakash aambedkar 
सोलापूर

वीज तोडायला आले तर बडवा ! ऍड. प्रकाश आंबेडकरांचा ग्राहकांना सल्ला

तात्या लांडगे

सोलापूर : ग्राहकांनी वीज वापरली नसतानाही अनेकांना भरमसाठ बिले देण्यात आली आहेत. व्यावसायिक व घरगुती बिलाचे दरही वाढविले. अशा परिस्थितीत कॉंग्रेस नेते तथा उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल माफी द्यायला हवी होती. जेणेकरून ते जनतेत हिरो झाले असते आणि मृत कॉंग्रेस पुन्हा जीवंत झाली असती, असे वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खोटारडेपणा आता उघड झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला आणि वीज तोडायला आलेल्यांना धरून बडवा, असा सल्ला ऍड. आंबेडकर यांनी यावेळी दिला.

ऍड. आंबेडकर म्हणाले...

  • 50 टक्‍के वीज बिल माफ करावे म्हणून वीज खात्याने दिला सरकारला प्रस्ताव
  • कॉंग्रेसचे मंत्री दुबळे, अधिवेशनात वीज बिल माफीचा निर्णय घेतला असता तर मेलेली कॉंग्रेस पुन्हा जीवंत झाली असती
  • सरकारला निर्णय घेतला बारामतीचा अडसर; मुख्यमंत्री सरकार टिकावे म्हणून घाबरत आहेत
  • अजित पवारांनी सभागृहात वीज तोडणीला स्थगिती दिल्याचे सांगितले; पुन्हा वीज तोडणी सुरुच
  • उपमुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा झाला उघड; शेतकऱ्यांच्या पिकांना वीज कपातीमुळे पाणी मिळेना
  • वीज कापायला आल्यास ग्राहकांनी संबंधितांना बडवावे; कितीही गुन्हे दाखल होऊ द्या
  • वीज बिलांबाबत सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी माझ्यासोबत चर्चेला बसावे; दरवाढीमुळे वाढली बिलाची थकबाकी
  • वीज तोडायला आले तर बडवा ! ऍड. प्रकाश आंबेडकरांचा ग्राहकांना सल्ला
  • सचिन वाझे प्रकरणी 22 मार्चला राज्यपालांना भेटणार
  • लॉकडाउन जनतेला नकोय; अर्थव्यवस्था कोलमडल्यास जनतेला खायला अन्न मिळणार नाही
  • एकाच राज्यात 17 वेळा जाणे पंतप्रधानांना शोभणारे नाही

कोरोना काळात व्यावसायिकांसह बहुतेक नागरिकांनी वीजेचा वापर तेवढ्या प्रमाणात केला नसतानाही त्यांना बिले वाढीव देण्यात आली. वीजेच्या बिलाची रक्‍कम अथवा एकूण थकबाकी का वाढली, यासंदर्भात सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी माझ्यासोबत चर्चेसाठी यावे, असे खुले आव्हानही ऍड. आंबेडकर यांनी यावेळी दिले. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्‍चित करण्याच्या निमित्ताने ऍड. आंबेडकर हे आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री कोणताही निर्णय स्वत:हून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना बारामतीचा अडसर असल्याचेही ते म्हणाले. कॉंग्रेसचे मंत्री दुबळे असून त्यांच्या हातात काहीच नसल्याचेही त्यांनी सांगितले. अडचणीतील जनता, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून कॉंग्रेस नेत्यांना जनतेत हिरो होण्याची संधी होती. मात्र, त्यांनी तसा निर्णय घेतला नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांनी अधिवेशन काळात वीज तोडणी स्थगित केल्याचे सांगितले, मात्र आता सर्वत्र वीज तोडणी सुरु असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT