beating husband molesting married woman case registered against SRPF jawan along with his wife Sakal
सोलापूर

Solapur Crime : विवाहितेचा विनयभंग करुन पतीस मारहाण; एसआरपीएफ जवानासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

२९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास संशयित गणवेशात फिर्यादीच्या घराजवळ गेला

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : विवाहितेचा विनयभंग करून तिच्या पतीस मारहाण केल्याप्रकरणी राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानासह त्याच्या पत्नीविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

साबीर अत्तार, मुबीना अत्तार (रा. प्लॉट क्र. ११, ब्लॉक बी, मीरा नगर, जुळे सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित पती - पत्नींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने (वय ३२) फिर्याद दिली आहे. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास संशयित साबीर हा गणवेशात फिर्यादीच्या घराजवळ गेला.

तिची छेडछाड करत तिच्या खांद्यावर हात ठेवल्याने तिने त्याला ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याने तू माझ्याशी बोल, मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणत तिच्या गळ्यात हात घालून ओढत तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिने पतीस घडला प्रकार सांगितला.

सोमवारी (ता. ४) सकाळी सव्वासातच्या सुमारास तिचा पती मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. तेथून परतताना संशयितांना त्याबाबत विचारणा केली. त्यावर मुबीना हिने त्यांना शिवीगाळ करीत चप्पलने मारहाण केली. माझ्या लोकांना घेऊन येतो, मग तुम्हाला दाखवतो, अशी दमदाटीही केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT