Begumpur Machnur bridge has come under water due to flood on Bhima river.jpg 
सोलापूर

भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे बेगमपूर माचनूर पूल पाण्याखाली

अशपाक बागवान

बेगमपूर (सोलापूर) : भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे बेगमपूर माचनूर दरम्यान पूल आज सकाळी साडे अकराच्या सुमारास पाण्याखाली आला आहे. दरम्यान कामती पोलिसांनी सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील वाहतूक बेगमपूर येथील इंदिरानगर चौकात थांबविली.

मागील तीन ते चार दिवसांपासून उजनी धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरण भरल्याने भीमा नदीच्या पात्रात विसर्ग सोडण्यात आला. सध्या बेगमपूर पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. दरम्यान रात्री सव्वादोन लाखाच्या दरम्यान सोडलेल्या पाण्याचा विसर्ग अद्याप बेगमपूरपर्यंत पोहचला नाही. तो विसर्ग  आज रात्री उशिरपर्यंत पोहचल्यास संपूर्ण पूल पाण्याखाली येणार आहे. दरम्यान कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून मार्गावरील वाहतूक थांबविली आहे. 

महापूराच्या पाण्याचा भीमा नदी काठावरील मोहोळ तालुक्यातील बेगमपूर, मिरी,अरबळी, अर्धनारी व मंगळवेढा तालुक्यातील बठाण, उचेठाण, ब्रम्हपुरी, माचनूर, रहाटेवाडी, तामदर्दी, सिध्दपुर, ताडोर या भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूराच्या तडाख्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी नदीकाठी बसलेल्या मोटरी गेल्या दोन दिवसात मोठी लगबग करून सुरक्षित ठिकाणी ठेवल्या तर गत महिन्यातच उजनी धरण भरल्यामुळे भविष्यात उजनीतून नियमित पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्यामुळे नदीकडील शेतकऱ्यांनी नवीन ऊस व इतर पिकांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून खते बियाणे खरेदी केली. परंतु या पुरामुळे हा केलेला खर्च पाण्यात गेला.
 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT