ujani dam sakal
सोलापूर

भीमा पाणलोट तुडुंब; 'उजनी'ला प्रतीक्षा !

लाखो हेक्टर शेतीसाठी संजीवनी असलेले 'उजनी' धरण सध्या पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे.

सचिन गुरव

सिद्धटेक : लाखो हेक्टर शेतीसाठी संजीवनी असलेले 'उजनी' धरण सध्या पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे. भीमा नदी पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे 'फुल्ल' झाली आणि त्यातून उजनी धरणात विसर्गही सुरू झाला. मात्र, उजनी धरण परिसरात पुरेसा पाऊस नसल्याने सध्याच्या पाणीसाठ्याच्या ६० ते ८२ टक्क्यांदरम्यानच्या या रेंगाळलेल्या प्रवासाने शेतकरीवर्गाला श्वास रोखून धरायला भाग पाडले आहे.
अनेक दिवसांपासून उजनी धरणात नवीन पाण्याची आवक पूर्णपणे थांबली होती. त्यातच पाऊसही थांबल्याने धरणातील पाण्याचा उपसा वाढला होता. त्यामुळे धरणातील पाणी पातळी पुन्हा रोडावेल, अशीच काहीशी परिस्थिती होती. परंतु, पुन्हा एकदा भीमा पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरली. खडकवासला, पवना, कासारसाई, चासकमान, आंद्रा, वरसगाव, कलमोडी, पानशेत या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाल्याने उजनी धरणातील पाणीसाठा ६२ टक्‍क्‍यांवरून ८२ टक्‍क्‍यांवर पोचला आहे.

आता पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिली दिल्याने धरण भरण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.दरम्यान, मागील वर्षी याच दिवशी उजनी धरण ११० टक्के म्हणजेच पूर्ण क्षमतेने भरले होते.
उजनी धरणातील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोचला असून अजूनही पाण्याची आवक सुरूच आहे. त्याबरोबरच आणखी परतीच्या मॉन्सूनचा पाऊस जमेची बाजू असल्यामुळे उशिरा का होईना, धरण नक्कीच भरणार आहे.
- धीरज साळे, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meta Layoffs : AI आणि ऑटोमेशनचा दबाव वाढला! Meta मध्ये मोठ्या बदलांची सुरुवात; नव्या प्लॅनमध्ये ८,००० नोकऱ्या धोक्यात

Sharad Pawar: शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत; शेअर केली भावनिक पोस्ट

MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्याय

Post Result Anxiety: 90-95% गुण मिळूनही मुलं आनंदी का नाहीत? ‘पोस्ट-रिझल्ट अँझायटी’ म्हणजे काय आणि पालकांनी काय करावं?

Latest Marathi News Live Update : सीएसएमटीच्या स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT