Bhima Sugar Factory Sakal
सोलापूर

Bhima Sugar Factory : 'भीमा' देणार 2 हजार 400 रुपये पहिली उचल

चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाची पहिली उचल म्हणून प्रति टन 2 हजार 400 रुपयांप्रमाणे देण्यात येणार असल्याची घोषणा खा. धनंजय महाडिक यांनी केली.

राजकुमार शहा

मोहोळ - चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाची पहिली उचल म्हणून प्रति टन 2 हजार 400 रुपयांप्रमाणे देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खा. धनंजय महाडिक यांनी केली, तर गाळप झालेल्या उसाचे पैसे पाचव्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी केली.

टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 44 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा व मोळी पूजन खा. धनंजय महाडिक व कारखान्याचे पाच ज्येष्ठ सभासद सिद्धेश्वर पवार, सुखदेव चवरे, बजरंग चव्हाण, तानाजी हांडे व औदुंबर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी खा. महाडिक व अध्यक्ष विश्वराज महाडिक बोलत होते.

अध्यक्ष विश्वराज महाडिक पुढे बोलताना म्हणाले, चालू गळीत हंगामात मी कामगारांबरोबर स्वतः काम करणार आहे, कारण त्याशिवाय अडचणी समजत नाहीत. मी ही कारखान्याचा सेवक आहे. दररोज जास्तीत जास्त साडेपाच हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करण्यात येणार आहे. गाळप हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असून, बॉयलर व इतर यांत्रिक विभागातील सर्व कामे झाली आहेत.

कारखाना हा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चालतो त्यांचा मोठा सहभाग असतो त्यासाठी कामगारांची दिवाळी गोड व्हावी म्हणून 8.33 टक्के बोनस व 15 किलो साखर मोफत देण्याची घोषणा यावेळी केली. तर सिव्हिल विभागातील कामगारांना शंभर रुपये रोज वाढ करण्याचीही घोषणा अध्यक्ष महाडिक यांनी केली.

यावेळी खा. महाडिक म्हणाले, केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शहा यांनी धाडसी निर्णय घेतल्याने साखर कारखान्यांना अच्छे दिन आले आहेत. दरम्यान येत्या 26 तारखेला होणाऱ्या पाणी नियोजन बैठकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विनंती करून उजनीच्या पाण्याचे पहिले आवर्तन डिसेंबर व दुसरे मार्चमध्ये सोडावे अशी विनंती करणार आहे. कारण उजनीची पाणी पातळी यावर्षी 60 टक्क्यांवर थांबली आहे.

यावेळी कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, सुनील चव्हाण, अंकुश अवताडे, वीरसेन देशमुख, दीपक पुजारी, विशाल पवार, विकास पाटील, माणिक बाबर, महादेव देठे, छगन पवार, पांडुरंग ताटे, भीमराव वसेकर, यांच्यासह सर्व खाते प्रमुख, कर्मचारी सर्व संचालक, ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचलन पांडुरंग ताठे यांनी केले तर आभार सुनील चव्हाण यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT