Dhananjay Mahadik sakal
सोलापूर

Bhima Sugar Factory : 'भीमा' च्या नामकरणाचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर

सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. वरचे वर निसर्गाची अवकृपा हे ही त्याला महत्त्वाचे कारण आहे.

राजकुमार शहा

मोहोळ - टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या शनिवार ता. 30 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत कै. पैलवान भीमराव (दादा) महाडिक सहकारी साखर कारखाना असे नामकरण करण्याचा ठराव आवाज मतदानाने मंजूर झाला असून, कारखान्याच्या सभेत काय ठराव झालेत याची प्रत दिवंगत सभासद व कर्मचारी यांच्या घरी पोहोचविली पाहिजे ही प्रथा सुरू करावी, अशी सूचना कारखान्याला दिली असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खा. धनंजय महाडिक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

खा. महाडिक म्हणाले, सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. वरचे वर निसर्गाची अवकृपा हे ही त्याला महत्त्वाचे कारण आहे. साखर कारखान्यांना पूर्वीप्रमाणे आता उसा पासून फक्त साखर उत्पादित करून चालणार नाही तर, विविध उपपदार्थ निर्मितीवर भर दिला तरच भविष्यात साखर कारखानदारी टिकणार आहे.

सर्वांचे दर वाढले आहेत, त्या पार्श्वभूमीवर काही बदल होणे गरजेचे आहे. मी केंद्र शासनाच्या सहकार विभागाकडे काही मागण्या करणार असल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले. त्या मागण्या मान्य झाल्या तर साखर कारखाने व शेतकरी यांचा फायदा होणार आहे.

अशा आहेत मागण्या -

  • सध्या साखरेची एमएसपी 3 हजार 100 रुपये आहे ती 3 हजार 600 रुपये करावी.

  • मिठाई व अन्य पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या साखरेचा दर 45 रुपये प्रति किलो करावा.

  • इथेनॉलचा दर प्रति लिटर 70 रुपये करावा, त्यासाठी राज्य शासनाने पाच रुपये अनुदान द्यावे.

  • सह वीज निर्मिती प्रकल्पातून तयार झालेल्या विजेचा दर 7 रुपये प्रति युनिट करावा.

  • उसाचा पिक विम्यात समावेश करावा.

  • शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक व शेती पुरक कर्जाचे पुनर्गठन करून त्याच्या फेडीची मुदत दोन वर्ष करावी.

दरम्यान सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत, ती सेवा सुरू झाली तर दळणवळण वाढणार आहे व व्यापाऱ्यांचा ही फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : 'बजेट' शब्द कुठून आला? सकाळी 11 वाजताच बजेट का सादर केलं जातं? जाणून घ्या बजेटविषयी महत्तवाच्या गोष्टी

Republic Day 2026: संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारा फोटो! 77व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींचा खास लूक चर्चेत

गौतम गंभीर, सूर्यकुमार यादव यांनी संजू सॅमसनची मदत करायला हवी! अजिंक्य रहाणेची विनंती; म्हणाला, त्याला एकटं पाडू नका...

India US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारात डोनाल्ड ट्रम्प यांचाच खोडा, लीक ऑडियो क्लिपमध्ये धक्कादायक खुलासा

Chandra Shani Yog 2026: धक्का देणारा ग्रहयोग! 27 जानेवारीला चंद्र–शनी दृष्टीमुळे वृषभसह ‘या’ 2 राशींची परीक्षा

SCROLL FOR NEXT