Vishwaraj Mahadik sakal
सोलापूर

Vishwaraj Mahadik : भीमा मल्टीस्टेट न होता सभासदांच्या मालकीचाच राहणार,अध्यक्ष विश्वराज महाडिक

भीमा सहकारी साखर कारखाना हा मल्टीस्टेट न होता तो सभासदांच्या मालकीचाच राहणार असुन सभासदांनी भुलथापांना बळी पडु नये.

राजकुमार शहा

मोहोळ - टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखाना हा मल्टीस्टेट न होता तो सभासदांच्या मालकीचाच राहणार असुन सभासदांनी भुलथापांना बळी पडु नये, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी दिली.

भीमा साखर कारखाना हा मोहोळ, पंढरपुर व मंगळवेढा या तीन तालुकाच्या कार्यक्षेत्रात सहकारी तत्त्वावर सन1974 साली संस्थापक अध्यक्ष स्व. भीमराव (दादा) महाडिक यांनी प्रती दिन 1250 मेट्रीक टन क्षमतेचा परवाना मिळवुन स्थापन केला. त्याचा चाचणी हंगाम ही 1980 साली झाला. मध्यंतरीच्या कालावधीत गाळप क्षमता प्रतीदिन 2 हजार 500 मेट्रीक टन करण्यात आली.

सभासदांनी गळीत हंगाम 2011/12 मध्ये निवडणुकीत सभासदांनी विश्वास ठेवुन संसदरत्न खा. धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्याकडे कारखान्याची एक हाती सत्ता दिली. कारखान्यास ऊसाची उपलब्धता वाढल्याने सभासद व शेतकरी यांचा ऊस हा अतिरीक्त झाल्याने तो इतर कारखान्यास गाळपास द्यावा लागत होता. याचा विचार करुन गळीत हंगाम 2015/16 मध्ये कारखान्याची गाळप क्षमता 2500 मेट्रीक टनावरुन 5 हजार प्रतीदीन मेट्रीक टन गाळप क्षमता वाढविली.

सभासदांच्या ऊसास जास्तीत जास्त दर देता यावा म्हणुन 25 मेगॅवॅटचा सहविज निर्मीती प्रकल्प कार्यान्वीत झाला आहे. तसेच सन 2022 मध्ये झालेल्या पंचवार्षीक निवडणुकीत ही भरघोस मताने कारखान्याची सत्ता पुन्हा आमच्या हातात दिली.

या सभासदांच्या विश्वासास पात्र राहून सभासद व कामगारांना जास्तीत जास्तीत जास्त पैसे कसे देता येईल याचा विचार करुन 160 के.एल.पी.डी. चा असावणी प्रकल्प तसेच ईथेनॉल प्रकल्प मंजुरी करीता संबंधीत विभागाकडे शासन दरबारी त्याचे कामकाज चालु असुन तो लवकरच आपण उभारणी करीता घेत आहोत.

गेल्या 10 ते 15 दिवसा पासुन काही असंतुष्ट व्यक्ती हे कारखाना मल्टीस्टेट करणार आहेत अशा अफवा उठवित आहेत. परंतु असे काहीही न होता सभासदांनी ठेवलेल्या विश्वासा प्रमाणे कारखाना हा सहकारी तत्वावर व सभासदांच्या मालकीचाच राहणार असल्याचा पुनुरूच्चार कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या वतीने जरांगेंशी चर्चा करणारे राजेंद्र साबळे कोण? कसे बनले OSD?

'मी आदेशसोबत पळून जाऊन लग्न केलं त्यावेळी १८ वर्षाचे होते' सुचित्रा बांदेकर म्हणाल्या...'तो काहीच कमवत नव्हता, आणि...'

Latest Maharashtra News Updates: हुजूर साहिब नांदेड ते मुंबई, पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

भारताची चंद्राकांक्षा! 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न साकारणार; चांद्रयान-6,7,8 चा प्लॅन तयार

Vaishno Devi Landslide : वैष्णोदेवी मार्गावर दरड कोसळली; अर्धकुंवारीजवळ शेकडो भाविक अडकल्याची शक्यता...बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT