Bhoyar 
सोलापूर

श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी वारकरी प्रतिनिधी म्हणून मिळाला भोयर दाम्पत्याला मान

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कार्तिकी एकादशीच्या दिवशी (गुरुवारी) पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. या वेळी श्री विठ्ठल मंदिरात गेल्या दहा वर्षांपासून वीणेकरी म्हणून पहारा देणाऱ्या कवडूजी नारायण भोयर (वय 64) व त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयर (वय 55) या दाम्पत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळणार आहे. मंदिरातील एकूण सहा वीणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून ही निवड आज करण्यात आली. भोयर दाम्पत्य मूळचे वर्धा जिल्ह्यातील आहेत. 

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशी दिवशी शासकीय महापूजेच्या वेळी दर्शन रांगेतील एका वारकरी दाम्पत्याची वारकरी प्रतिनिधी म्हणून निवड केली जाते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेच्या वेळीही वारकऱ्यांना श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात प्रवेश देण्यात आला नव्हता. त्या वेळी मंदिरात वीणेकरी म्हणून चोवीस तास पहारा देण्याची सेवा करणाऱ्या एका वीणेकऱ्याची चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली होती आणि त्या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान देण्यात आला होता. 

यंदा कार्तिकी यात्रेवेळी देखील वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश नसल्याने आषाढी प्रमाणेच मंदिरातील वीणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून कवडूजी भोयर यांची निवड करण्यात आली आहे. कवडूजी भोयर हे मूळचे डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा येथील रहिवासी असून गेल्या नऊ - दहा वर्षांपासून पंढरपूर येथील श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात ते वीणेकरी म्हणून पहारा देत आहेत. ते स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय माळकरी आहेत. मागील आठ महिन्यांपासून लॉकडाउन काळात देखील ते मंदिरात पूर्णवेळ सेवा करीत आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT