CA Final  esakal
सोलापूर

मोठा निर्णय! प्रश्नपत्रिका वाचायला मिळणारे १० मिनिटे आता बंद; पेपर सुरु झाल्यावरच मिळणार प्रश्नपत्रिका

पेपर सुरु होण्याच्या दहा मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत बंद आहे. १९ जूनपासून सुरु होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपर सुरु होताच प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पेपर सुरु होण्याच्या दहा मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत आता बंद होणार आहे. १९ जूनपासून सुरु होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपर सुरु होताच प्रश्नपत्रिका दिली जाणार असल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पेपर सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नपत्रिका वाचून उत्तरे सोडवावी लागणार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत जिल्ह्यातील १०९ महाविद्यालयातील जवळपास ७० हजार विद्यार्थी आता सत्र परीक्षा देणार आहेत. सोमवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. महाविद्यालय तेथे परीक्षा केंद्र असणार आहे.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक असणार असून विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील पथक परीक्षेवर वॉच ठेवणार आहे. ८० गुणांच्या पेपरसाठी तीन तासांचा तर ४० गुणांसाठी दोन तासांची वेळ दिली मिळणार आहे. पेपर सुरू व्हायला काही वेळ शिल्लक असताना विद्यापीठाकडून संबंधित महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका मिळणार आहेत.

पेपर सुरु झाल्याची बेल वाजताच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातील. कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी, यादृष्टीने विद्यापीठाने तगडे नियोजन केले असून परीक्षा संपल्यानंतर ऑनस्क्रिन मूल्यमापन पद्धतीने ३० दिवसांत निकाल जाहीर व्हावा, यासाठी देखील विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

विद्यापीठ परीक्षेबद्दल थोडसं...

  • एकूण परीक्षा केंद्रे : ११०

  • परीक्षा देणारे विद्यार्थी : ७०,०००

  • परीक्षेसाठी वेळ : २ आणि ३ तास

  • दररोज किती पेपर : ३ सत्रात परीक्षा

  • उत्तरपत्रिका मिळणार : १५ मिनिटे अगोदर

  • प्रश्नपत्रिका मिळणार : पेपर सुरू झाल्यावरच

  • परीक्षेचा कालावधी : १९ जून ते ३१ जुलै

निकालापूर्वीच सुरु होणार आगामी शैक्षणिक वर्ष

कोरोना काळात विस्कळीत झालेले विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. फेब्रुवारी-मार्चमध्ये सत्र परीक्षा झाल्यानंतर ६५ दिवसांतच दुसरी सत्र परीक्षा होत आहे. वास्तविक पाहता दोन सत्रात ९० दिवसांचे अंतर असावे, असा विद्यापीठ अनुदान आयोगाचा नियम आहे. पण, सुटीतही अध्यापन केल्याचे सांगून ही सत्र परीक्षा होत आहे. दुसरीकडे आता सत्र परीक्षा संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात १ ऑगस्टपासून होणार आहे. निकालापूर्वीच शैक्षणिक सुरु होईल आणि त्यानंतर निकाल जाहीर होतील, अशी सद्य:स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT