Big decision from Pandharpur Municipality on the background of Ashadi Wari
Big decision from Pandharpur Municipality on the background of Ashadi Wari 
सोलापूर

ब्रेकिंग : आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील 400 मठ दोन महिन्यांसाठी बंद

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातून काही वारकरी भाविक पंढरपुरात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नगरपालिकेने खबरदारी म्हणून पंढरपूर व परिसरातील जवळपास चारशेहून अधिक मठ पुढचे दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पाालिकेने सर्व मठांच्या व्यवस्थापकांना तशा लेखी नोटीसा दिल्या आहेत, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात आहेत. यामध्ये नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग, शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करणे, शहरातील स्वच्छता राखणे, व्यवसायिकांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना सोशल डिस्टन्सींग विषयी माहिती देणे आदींचा समावेश आहे. विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करुनही शहरात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हादरुन गेले आहे. त्यानंतर बाधीत भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
अशातच निर्जला एकादशीच्या दिवशी राज्याच्या अनेक भागातून काही वारकरी पंढरपुरात आले होते. ही गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने संबंधीत वारकर्यांवर कारवाई करण्यात आली.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
१ जुलै रोजी आषाढी वारी आहे. राज्य सरकारने पालखी सोहळा रद्द केला असला तरी अनेक भाविक एकादशी दिवशी किंवा त्यापूर्वी शहर व परिसरातील मठांमध्ये येण्याची शक्यता आहे. बाहेरगावाहून वारकरी मठामध्ये आले तर पंढरपुरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे आहे. ही गंभीर बाब म्हणून पालिकेने शहर व परिसरातील सुमारे साडेतीनशे ते चारशे मठ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मठांमध्ये नव्याने कोणालाही प्रवेश देवूनये, दिल्यास संबंधीत मठांवर कारवाई केली जाईल असा, इशाराही पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. आज पालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनीही शहर व परिसरातील काही मठांना भेटी देवून मठांच्या व्यवस्थापकांना सूचना दिल्या.
नगराध्यक्षा साधना भोसले म्हणाल्या, आषाढी एकादशीच्या पूर्वी काही भाविक विविध मठांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून आता पासूनच बाहेर गावाहून येणार्या भाविकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. मठांच्या व्यवस्थापकांनी पुढचे दोन महिने कोणालाही मठात प्रवेश देवूनये. मठांमध्ये बाहेरील लोक दिसून आल्यास संबंधीत मठाच्या व्यवस्थापकांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT