0College_1.jpg 
सोलापूर

मोठी बातमी ! विद्यापीठाची 26 एप्रिल ते 20 मेपर्यंत ऑनलाइन परीक्षा

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, शहर-जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आता ही परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपारिक अभ्यासक्रमाच्या (बीए, बी-कॉमसह इतर) विद्यार्थ्यांची परीक्षा 26 एप्रिल ते 4 मे तर अभियांत्रिकी आणि फार्मसी, आर्किटेक्‍चर विद्यार्थ्यांची परीक्षा 5 ते 20 मे या काळात होणार आहे.

ठळक बाबी...

  • प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा (पारंपारिक अभ्यासक्रम) 26 एप्रिल ते 4 मेपर्यंत होईल
  • अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चरच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 5 ते 20 मे या कालावधी होणार
  • विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची सोमवारी (ता. 15) बैठक
  • अभियांत्रिकी व फार्मसीच्या विद्यार्थ्यांची प्रथम व तृतीय सत्र परीक्षा एकाचवेळी घेण्याचे नियोजन
  • विद्यापीठ आणि संलग्नित 101 महाविद्यालयांमधील 38 हजार विद्यार्थी देणार परीक्षा

सोलापूर शहरात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील 13 दिवसांत बाराशेहून अधिक रूग्ण आढळले असून 20 हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस व महापालिका प्रशासनाने बेशिस्तांवरील कारवाई कडक केली आहे. दुसरीकडे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होणार असून कोरोनासंबंधीचे निर्बंध आणखी कडक केले जाणार आहेत. तत्पूर्वी, संभाव्य परिस्थितीनुसार विद्यापीठाने ऑफलाइन अथवा ऑनलाइन परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन घेणे अशक्‍य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत विद्यापीठाने आता परीक्षा ऑनलाइन घेण्याचे निश्‍चित केले असून मंगळवारपर्यंत वेळापत्रक विद्यापीठाकडून संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. अभियांत्रिकी व फार्मसीसाठी काही विद्यार्थी थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रथम व तृतीय सत्र परीक्षा एकाचवेळी घेतली जाणार आहे, असेही विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीहिताचे नियोजन
पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन व ऑफलाइन घेण्याचे नियोजन केले आहे. कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोनाची परिस्थिती पाहून ही परीक्षा ऑनलाईनच होईल. त्यासंबंधीचा निर्णय सोमवारी अथवा मंगळवारी जाहीर केला जाईल. 
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: कायद्याचा हेतू वेश्यांना गुन्हेगार ठरवणं नाही, तर तस्करी आणि शोषण रोखणं आहे, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Vidhan Parishad Election : भाजपच्या दबावतंत्रापुढे शिंदेसेना झुकली? अखेरच्या क्षणी उमेदवार बदल; कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

फुटबॉल चाहत्यांसाठी गुडन्यूज! अखेर FIFA World Cup चे सामने भारतात दिसणार; कोणासोबत अन् किती रुपयांची झाली डील?

'या' अभिनेत्याने रणवीर सिंहला मारली होती तब्बल 24 कानशिलात! कॅमेऱ्यात कैद झाली घटना; नेमकं काय घडलं होतं?

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. चंद्रकांत लिमये यांचं निधन; कौटुंबिक सहलीदरम्यान घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT