pakshi Sptah.jpg 
सोलापूर

सोलापूरातील रस्त्यावर अवतरले पक्षीजगत : पक्षी सप्ताहानिमित्त फिरते छायाचित्र प्रदर्शन 

अरविंद मोटे

सोलापूर : सकाळच्या रम्य वेळी रस्त्याच्या बाजूला पदपथावरच तुम्ही कधीही न पाहिलेल्या पक्ष्यांच्या छबी अवतरल्या तर कोणालाही अत्यानंद झाल्याशिवाय राहणार नाही. हाच अत्यानंद सोलापूरच्या वेगवेगळ्या भागातील नागरिकांना सध्या अनुभवता येत आहे. 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत राज्य सरकारने पक्षी सप्ताह साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यानिमित्त शहरातील विविध भागात दररोज सकाळी 6ते 9 पर्यंत पंकज चिंधरकर यांनी छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 
राज्य सरकारच्या वतीने मारुती चितमपल्ली यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहाचे आयोजन केले आहे. वन खात्याच्या वतीने निसर्ग परिचय केंद्र, सिध्देश्‍वर वनविहार येथे पक्ष्यांचे पंख, दुर्मीळ वृक्षांची फळे, बिया यांच्या प्रदार्शानाचे आयोजन केले आहे. तसेच पंकज चिंधरकर यांनी संग्रहित केलेल्या छायाचित्रांचे फिरते प्रदर्शन ही आयोजित केले आहे. 
जगविख्यात छायाचित्रकारांनी टिपलेल्या भारतात आढळणाऱ्या अनेक देशी-विदेशी पक्ष्यांची ही छायाचित्रे अतिशय सुंदर व माहितीदायी आहेत. 5 नोव्हेंबर पासून अनुक्रमे, अक्कलकोट रोड, डीमार्ट परिसर व राजस्वनगर येथे सकाळी 6 ते 9 पर्यंत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. रविवारी (ता. 8) सकाळी 6 वा. अवंतीनगर येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. 

"सकाळ टाइम्स'चे सहकार्य 
या प्रदर्शनान मांडलेली छायाचित्रे ही "सकाळ टाइम्स'चे प्रायोजित केलेली बालगंधर्व पुणे येथे वन खाते, पुणे महापलिका व नेचर वॉक यांनी आयोजित केलेल्या "बर्ड फेस्त'मधील आहेत. पंकज चिंधरकर यांना ती संग्रहासाठी देण्यात आलेली आहेत. बैजू पाटील, श्रीकांत रानडे, यशवंत पाटील, संजय देशपांडे, विशाल जाधव यांनी टिपलेली आहेत. आज अवंतीनगर परिसरात हे प्रदर्शन होणार आहे. 

सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, पक्ष्यांसंवर्धनाबाबत लोकांमध्ये जनजगृती व्हावी, या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याचा निश्‍चितच जैवविविधता सर्वंधनासाठी फायदा नक्कीच होईल. घराच्या दारातच उघड्या आकाशाखाली कोरोनाचे सर्व नियम पाळून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT