सोलापूर

संचारबंदीच्या कालावधीत `या` महापालिकेचे महत्त्वाचे काम मार्गी

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : संचारबंदी कालावधीचा फायदा घेत महापालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणीचे आठ हजार दाखले तयार झाले आहेत. लॉकडाउन उठल्यानंतर हे दाखले संबंधितांना वितरित केले जाणार आहेत. 

कोरोना पार्श्‍वभूमीवर जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी शहरात सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी थांबविण्यासाठी जन्म-मृत्यूचे दाखले देण्याची कार्यवाही 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र, संचारबंदी कालावधीत प्रलंबित दाखले बनविण्याच्या कामाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार कामकाज करण्यात येत आहे. महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात रोज सरासरी हजार दाखल्यांची मागणी होत आहे. आतापर्यंत अंदाजे 30 हजार दाखल्यांची मागणी करण्यात आली आहे. दाखल्यांसाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याच्या शक्‍यतेने कर्मचाऱ्यांनी काम बंद केले होते. 

नागरिकत्व सुधारणा कायदा अमलात आल्यानंतर दाखले काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. लोकांची वाढती गर्दी पाहता येथे आयुक्तांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. त्यामुळे दाखले देण्यातील अडचण काही प्रमाणात दूर झाली आहे. दाखला देण्यासाठी जी तारीख नागरिकांना देण्यात आली आहे, त्या तारखेला दाखला मिळालाच पाहिजे, अशा सूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोना पार्श्‍वभूमीवर अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होऊ लागल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले होते. 

सोलापूर नगरपालिकेच्या कालावधीत 1927 ते 1930 च्याही दाखल्याची मागणी करण्यात आली आहे. हा दाखला तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. येथे अतिशय जुने दाखले आहेत, मात्र अनेक दाखल्यांचे रजिस्टर जीर्ण झाले आहे. त्यामुळे एखादे पान फाटले तर त्याचा फटका संबंधित नागरिकांना बसणार आहे. शिवाय रजिस्टर तपासणीचा परिसर अतिशय दाटीवाटीचा आहे. अशा कोंदट वातावरणात कर्मचाऱ्यांना काम करावे लागले. मात्र आलेल्या अर्जानुसार आता दाखले बनविण्याचे काम पूर्ण झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी… BMC साठी २२७ वॉर्डमधील उमेदवारांची लाँग लिस्ट; कोण कुठून मैदानात? पाहा एका क्लिकवर

Pune News : बावधनमधील विवा हॉल मार्क सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला!

Nashik Cyber Fraud : सावधान नाशिककर! वर्षभरात सायबर भामट्यांनी मारला ५७ कोटींवर डल्ला; शेअर मार्केटच्या नावाने सर्वाधिक लूट

Crime News : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! ६ टन चोरीचे बॅटरी स्क्रॅप जप्त; छत्रपती संभाजीनगरमधून संशयित अटकेत

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी सोमनाथ स्वाभिमान पर्व सोहळ्यात होणार सहभागी

SCROLL FOR NEXT