विठ्ठल मंदिरात घुसण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न ! Canva
सोलापूर

विठ्ठल मंदिरात घुसणाऱ्या भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये धुमश्‍चक्री!

विठ्ठल मंदिरात घुसण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न !

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपुरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरीजवळ आंदोलन केले.

पंढरपूर (सोलापूर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरासह (Vitthal-Rukmini Temple) राज्यभरातील देवस्थाने भाविकांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी आज (सोमवारी) भाजपच्या (BJP) वतीने राज्यभरात आंदोलन (Agitation) करण्यात आले. दरम्यान, पंढरपुरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) व भाजप आमदार समाधान आवताडे (MLA Samadhan Awtade) यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरीजवळ आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. यामुळे पुढचा अनर्थ टळला.

आज सकाळी भाजप आध्यात्मिक आघाडीचे कार्यकर्ते व वारकऱ्यांनी संत नामदेव पायरीसमोर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करावे, या मागणीसाठी भजन आंदोलन सुरू केले. यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशी जोरदार मागणी केली. याच वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन थेट नामदेव पायरीपासून विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी तत्काळ कार्यकर्त्यांना रोखून धरले. या वेळी भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट देखील झाली. या सगळ्या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या आंदोलनामध्ये भाजप आमदार समाधान आवताडे, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम पापळकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, भाजप किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली हळणवर, भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, प्रणव परिचारक आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT