सोलापूर

भाजपकडून कोरोना प्रतिबंधासाठी मदत 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः कोरोनासारख्या भयानक रोगाला हरविण्यासाठी भाजपचे अनेक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. भाजपच्या बूथप्रमुखापासून ते प्रदेशाध्यक्षांपर्यंत सर्वजण कोरोनाला हरविण्यासाठी मदत करत आहेत. प्रत्येक जिल्ह्याने याबाबत काय कामकाज केले आहे, याचा आढावा दर दोन दिवसांनी प्रदेशाध्यक्षांकडून फोन कॉन्फरसिंगद्वारे घेतला जात असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी "सकाळ'ला दिली. 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रत्येक जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार हे या कॉन्फरसिंगमध्येही भाग घेत आहेत. यावेळी प्रत्येक जिल्हाध्यक्षांना त्यांनी केलेल्या कामाबाबत विचारणा केली जात आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने परराज्यातील लोकांना मदत करावी. त्याचबरोबर सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग देण्याचे आवाहन पक्षाच्यावतीने केले जात आहे. याशिवाय कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये म्हणून औषधाची फवारणी करण्यासाठी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी ट्रॅक्‍टर व फवारणी यंत्रेही प्रशासनाला दिली आहेत. सोलापुरातील जवळपास साडेतीन हजार लोकांना जेवण पोचविण्याचे काम केले जात आहे. जे परराज्यातील नागरिक आहेत, त्यांना धान्य देण्याचे काम केले आहे. जवळपास दीड-दोन हजार लोकांना धान्याचे वाटप केले आहे. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझरही वाटप केल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

SCROLL FOR NEXT