kirit somayya sakal
सोलापूर

ठाकरे-पवार सरकार म्हणजे 'अलीबाबा चाळीस चोर' : किरीट सोमय्या

ठाकरे-पवार सरकार म्हणजे "अलीबाबा चाळीस चोर' : किरीट सोमय्या

दत्तात्रय खंडागळे

किरीट सोमय्या म्हणाले, सांगोला साखर कारखान्यासह घोटाळ्यांची प्रकरणे आपल्याकडे आली असून, या सर्व घोटाळ्यांचा पाठपुरावा आपण करणार आहोत.

सांगोला (सोलापूर) : ठाकरे-पवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार आहे. हे सरकार महाराष्ट्राला (Maharashtra) लुटण्याचे काम करीत आहे. सांगोला साखर कारखान्यासह घोटाळ्यांची प्रकरणे आपल्याकडे आली असून, या सर्व घोटाळ्यांचा पाठपुरावा आपण करणार आहोत, असे भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी सांगोला (Sangola) येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

सांगोला येथील हॉटेल अँबेसिडर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या वेळी सोमय्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. किरीट सोमय्या पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या 23 महिन्यांत 24 घोटाळे बाहेर काढले असून, या सर्वांवर सध्या कारवाई सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेकांच्या चौकशा सध्या सुरू आहेत. अनेक मंत्री सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. सध्याच्या ठाकरे सरकारचे माजी गृहमंत्री फरार आहेत, कमिशनर परदेशात गेले आहेत, पोलिस अधिकारी अटकेत आहेत. हे सरकार आहे की माफिया आहे, असा प्रश्‍न करून, अनेक नेत्यांनी कारखाने लुटण्याचे काम केले असून, पवारांच्या घरात सर्वांचीच बेनामी मालमत्ता आहे. यासंदर्भातही आपण आवाज उठवत आहोत.

आता क्रांतीची सुरवात झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेला जागृत करण्याचे काम भाजप करत असून हजारो कोटींचे घोटाळे करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे. मात्र, आता लवकरच अलिबाबा आणि चाळीस चोरांना व घोटाळेबाज सरकारला घरी पाठवण्याचे काम भाजप करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीला दोन सामन्यांतही डेब्यू का नाही? अखेर टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने सांगितलं खरं कारण

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

'सगळ्या अ‍ॅक्टरचे अफेअर्स असतात' फराहने प्रश्न विचारताच रितेशने दिली 'अशी' प्रतिक्रिया, Viral Video

Sonai News : सोनईतील सावित्री सत्यवानासाठी आधार‘वड’; पतीला कोरोनात अंधत्व आल्यानंतर कुटुंबासाठी ‘ती’चा अहोरात्र संघर्ष

SCROLL FOR NEXT