Ram Satpute 
सोलापूर

"सरकारच्या हप्तेखोरीची शिक्षा जनतेला मिळतेय !' भाजप आमदाराचा सरकारवर हल्लाबोल

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : राज्यात कोरोनाचा विस्फोट होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोराना रुग्णांची वाढत आहे. काही जिल्हे लॉकडाउनही करण्यात आले आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत काही जिल्ह्यांतील हॉस्पिटल्समध्ये बेडची संख्या कमी पडत आहे. यावरून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍याचे आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारवर ट्विटरवरून हल्लाबोल केला आहे. 
 

आमदार राम सातपुते यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणतात, "कोणी बेड देता का बेड? महाराष्ट्र सरकारच्या ढिसाळ कारभाराची आणि हप्तेखोरीची शिक्षा आज महाराष्ट्राच्या जनतेला भेटत आहे. शांतीच्या काळात हप्तेखोरीत व्यस्त ठाकरे सरकार.' 

राज्यात गेल्या 24 तासांत 43,183 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 32,641 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. गेल्या चोवीस तासांत 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मृतांचा आकडा वाढला असल्याचं दिसत आहे. बुधवारी राज्यात हजारांच्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यात गुरुवारी आणखी वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यात 28,56,163 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 3,66,533 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत, तर 54,898 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 24,33,368 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली असून लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलंय. 

अशा परिस्थितीत भाजप आमदार राम सातपुते यांनी, महाराष्ट्र सरकारच्या ढिसाळ कारभाराची आणि हप्तेखोरीची शिक्षा आज महाराष्ट्राच्या जनतेला भेटत असल्याचा आरोप करून, शांतीच्या काळात हप्तेखोरीत ठाकरे सरकार व्यस्त असल्याचे टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT