

BEST electricity connection rules for Mumbai Ganeshotsav pandals 2026
ESakal
गणेशोत्सवाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बेस्टने गणेश मंडळांना वीज कनेक्शनसंदर्भात 'विद्युत मार्गदर्शक सूचना' जारी केल्या आहेत. मंडप उजळण्यापूर्वी मंडळांना ११ आवश्यक अटींची पूर्तता करावी लागेल. ऑनलाइन अर्ज, जागा मालकाची परवानगी, महानगरपालिका आणि पोलिसांची मंजुरी, विद्युत निरीक्षकाला दिलेल्या अर्जाची प्रत, मान्यताप्राप्त कंत्राटदाराकडून तपासणी आणि ईएलसीबी अहवाल यांसारखी कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत.