Jayasiddheshwar-Mahaswamy- 
सोलापूर

भाजप खासदारांची पंचाईत : 'अटकपूर्व'ला सरकारी वकिलांचा विरोध 

तात्या लांडगे

सोलापूर : भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व याचिकेवर सरकारी वकिलांनी पहिले जिल्हा व सत्र न्यायालयात म्हणणे सादर केले आहे. डॉ. महास्वामींनी गुन्हा केल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नये, असे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले आहे. त्यावर आता 13 मार्चला सुनावणी होणार आहे. 


जात पडताळणी समितीच्या निर्णयानुसार डॉ. महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आले. समितीच्या आदेशानुसार अक्‍कलकोट तहसिलदारांनी सोलापूर न्यायालयात डॉ. महास्वामींविरुध्द फिर्याद दिली. त्यानंतर सोलापूर न्यायालयाने डॉ. महास्वामींविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश सदर बझार पोलिसांना दिले. सदर बझार पोलिसांत त्यांच्याविरुध्द 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आता डॉ. महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राची सखोल चौकशी सुरु केली आहे. त्याचा तपास अहवाल आता न्यायालयासमोर ठेवला जाणार आहे. तत्पूर्वी, डॉ. महास्वामी यांचे वकिल संतोष न्हावकर यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पुनर्विलोकन करावे, अशी याचिका दाखल केली. त्यावर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार असून त्यावेळी आमची बाजू न्यायालयासमोर मांडू, असे ऍड. न्हावकर यांनी सांगितले. 


अटकपूर्व जामीन देऊ नये : सरकारी वकील 
खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले असून डॉ. महास्वामी यांना जामीन देऊ नये, सकृतदर्शनी त्यांनी गुन्हा केल्याचे दिसते, असे म्हणणे मी पहिले जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले आहे. 
- ऍड. प्रदिपसिंग रजपूत, जिल्हा सरकारी वकिल, सोलापूर 


एकाच दिवशी उच्च न्यायालय अन्‌ सोलापूर न्यायालयात सुनावणी 
जात पडताळणी समितीने भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून डॉ. महास्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आतापर्यंत एक सुनावणी पार पडली असून आता 13 मार्चला सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिवाद्यांनाही नोटीस बजावण्यात आली असून प्रतिवादीही त्यावेळी सुनावणीला हजर राहणार आहेत. तर डॉ. महास्वामी यांच्या अटकपूर्व जामिनावर त्याच दिवशी सोलापूर न्यायालयात सुनावणी होणार आहे. एकूणच मुंबई उच्च न्यायालय व सोलापूर न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT