BJP protest Mahavikas Aghadi leaders photo jodmaro andolan solapur politics marathi news Sakal
सोलापूर

Solapur Politics : भाजपाच्या वतीने तत्कालीन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या फोटोला जोडेमारो अंदोलन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारची पोलखोल

राजकुमार शहा

मोहोळ : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेला "कंत्राटी कामगार भरती"चा निर्णय रद्द केला आहे. या कंत्राटी भरती वरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम माजी मूख्यमंत्री उद्धव ठाकरे,

खा.शरद पवार, नाना पटोले व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. या विरोधात मोहोळ नगरपरिषदे समोर मोहोळ तालुका ,शहर भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडी च्या नेते मंडळीच्या प्रतिकात्मक फोटोला "जोडे मारो व माफीनामा" द्यावा म्हणून आंदोलन करण्यात आले.

कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले व महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राची माफी मागावी, त्या शिवाय भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही असे प्रतिपादन भाजपाचे शहर अध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर व युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश झाडे यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी संजय क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य संजीव खिलारे, मोहोळ विधानसभा अध्यक्ष दिलीप गायकवाड, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले,

रमेश माने, मुजीब मुजावर, विष्णु चव्हाण, फंटू गोफने , अविनाश पांढरे, नागेश क्षीरसागर, अंकुश अवताडे, रणजित चवरे, भारत आवारे, दीपक पुजारी, सरपंच अमोल व्यवहारे, राहुल व्यवहारे, दिलीप पाटील, गुरुराज तागडे,औदुंबर वाघमोडे, विशाल पवार, विशाल चौधरी, द्रोणाचार्य लेंगरे, अक्षय वाघमोडे, शैलेश कुंभार , पप्पू लांडगे आदी सह भाजपा तालुका,शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT