Mohol Nagar Parishad
Mohol Nagar Parishad 
सोलापूर

मोहोळ नगर परिषदेच्या इमारतीसाठी भाजपची स्वाक्षरी मोहीम 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ नगर परिषदेच्या नियोजित इमारतीची निर्मिती सध्याच्या मध्यवर्ती जागेतच करण्यात यावी, या मागणीसाठी मोहोळ भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी तालुकाध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. मोहोळ नगरवासीयांची जनजागृती करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. 

मोहोळ नगर परिषदेची नियोजित इमारतीच्या प्रश्नी आमचा विरोध कोणत्याही जागेला अथवा समूहाला नाही, तर नवीन इमारत सध्याच्या नगर परिषदेच्या जागेवर आहे त्या मध्यवर्ती ठिकाणीच झाली पाहिजे, अशी आमची रास्त न्याय्य मागणी असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सध्याच्या आठवडा बाजाराची जागा 26 आर आहे, तर सध्याच्या नगर परिषदेमधील मोकळी जागा 58 आर आहे. तसेच सध्याच्या नगर परिषद कार्यालयापासून तहसील, पोलिस, दुय्यम निबंधक, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, भूमी अभिलेख ही आस्थापने जवळ असल्याने नागरिकांची सोय होत आहे. मात्र नवीन इमारत बाजार तळावर नेल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे. 

या वेळी मोहोळ शहराध्यक्ष सुरेश राऊत, तानाजी दळवे, महेश चेंडगे, संजीव खिलारे, लक्ष्मण कृपाळ, रामदास झेंडगे, नागेश क्षीरसागर, शशिकांत दळवे, प्रभाकर दळवे, उत्तम पवार, संजय शिंदे, सुभाष पवार, गिरीश काळे, हरिदास जाधव, अरुण डोंगरे, धर्मराज दळवे, महादेव आवारे, बाबासाहेब भोसले, अप्पा चिनके, भारत पोफळे, चंद्रकांत क्षीरसागर, शिरसट, माऊली गायकवाड, रेवण झेंडगे, दत्तात्रय कारंजकर, गणेश शिंदे, मुकेश शिंदे, ऍड. हेमंतकुमार शिंदे, श्रीकांत गायकवाड, नारायण डोंगरे, अवधुत मोरे, विक्रम चेंडगे, गणेश धायगुडे, सुभाष काळे, गणेश चव्हाण, सुदर्शन मोरे आदींनी ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदविला. कार्यालयीन अधीक्षक श्रीमती चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT