Black market rations seized at Barshi 
सोलापूर

बार्शी येथे काळ्या बाजारात जाणारा लाखो रूपयांचा रेशनचा माल जप्त 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : शहरातील तुळजापूर रस्त्यावर असणाऱ्या मार्केट यार्डातील दुकानात काळ्या बाजारात जाणारी एक लाख 13 हजार 250 रुपयांची शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदूळ यांनी भरलेली 50 किलोची 151 ठिकी पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी दोघा जणांविरोधात रात्री उशीरा फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात उभे केले असता न्यायदंडाधिकारी आर. एस. दडके यांनी 11 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
जीवन उद्धव काळदाते (रा. दत्तनगर), ज्ञानेश्वर रामदास पवार (रा. सांजा चौक, उस्मानाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी रात्री सात वाजता मार्केट यार्ड गाळा क्रमांक 193 अ मध्ये घडली. संदेश पवार यांनी फिर्याद दाखल केली. पोलिस उपअधिक्षक सिद्धेश्वर भोरे यांना महिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांच्या पथकाने काळदाते ट्रेडिंग कंपनी येथे छापा टाकला. पोलिसांनी जीवन काळदाते यास रेशनचा स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळ कोठून आणला विचारले असता ज्ञानेश्वर पवार याने दिला असल्याचे सांगितले. या धान्याची व्यापारामध्ये कसलीही नोंद, पावत्या नसल्याचे स्पष्ट केले. 76 ठिक्‍यांमध्ये 57 हजार रुपये किंमतीचा 3 हजार 800 क्विंटल तांदूळ तर 75 ठिक्‍यांमध्ये 56 हजार 250 रुपये किंमतीचा 3 हजार 750 क्विंटल गहू भरुन काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात ठेवण्यात आला होता. 151 ठिक्‍यातील गहू-तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे दिसून येत असून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन पंच तसेच महसूल विभागातील अधिकारी यांच्यासमोर पंचनामा करून तपासणीसाठी नमुने घेतले व धान्य शासनाच्या ताब्यात दिले. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT