blackmail sakal
सोलापूर

सोलापूर : सासऱ्याकडून सुनेला ब्लॅकमेलिंग!

अंघोळ करताना काढले चोरुन शूटिंग; बळजबरीचा प्रयत्न

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : सूनेला मूल होत नसल्याचेनिमित्त करुन संबंध ठेवण्यासाठी तिचे अंघोळ करतानाचे व्हीडीओ काढून सूनेला ब्लॅकमेल केल्याच्या कारणावरुन पंढरपूर तालुक्‍यातील एकजणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन संबंधित आरोपीस ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आरोपीच्या सूनेला मूल होत नव्हते.

दोन आठवड्यापूर्वी आरोपीने स्वतःच्या सूनेच्या अंगावर हात टाकून तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पिडीत महिलेने आरडाओरड केल्याने आरोपी सासऱ्याने तिला सोडून दिले. घडलेल्या प्रकाराविषयी पिडीत महिलेने पतीस सांगितले होते. परंतु त्यावेळी पिडीतेची समजूत घातली गेली होती. दरम्यान, 20 डिसेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास पिडीत महिला घराच्यासमोर असलेल्या बाथरुममध्ये अंघोळीस गेली होती. तेव्हा आरोपीने पिडीत महिलेच्या न कळत मोबाईलमध्ये शुटींग काढले. त्यानंतर आरोपीने शूटींग पिडीत महिलेस दाखवून तुला माझ्या मुलापासून मुलबाळ होणार नाही.(accused took the shooting in the mobile )

तू माझ्याशी संबंध ठेवले नाही तर मी तुझे अंघोळ करतानाचे शुटींग पुढे पाठवीन, असे म्हणून ब्लॅकमेल केले. त्यावेळी पिडीत महिलेने फोन करण्याच्या कारणाने मोबाईल घेतला आणि आरोपी सासऱ्याची नजर चुकवून पिडीतेने शुटींग पाहून खात्री करुन घेऊन तो आपल्या भावाच्या मोबाईल वर पाठवला. आरोपीने पिडीत महिलेस हे शुटींग वारंवार दाखवून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. पिडीत महिला माहेरी गेली आणि तिने तिच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगून आज पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.कर्चे हे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT