download (4) - Copy.jpg 
सोलापूर

राज्यात रक्‍ताचा तुटवडा ! युवासेना अन्‌ विद्यार्थी कॉंग्रेसची सामाजिक बांधिलकी

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील रक्‍तपेढ्यांमध्ये रक्‍ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. आगामी पाच ते सात दिवस पुरेल इतकाच रक्‍तसाठा शिल्लक असल्याने युवासेना आणि विद्यार्थी कॉंग्रेसने आता सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. राज्यभर रक्‍तदार शिबिरांचे आयोजन केले असून 6 ते 11 डिसेंबरपर्यंत महारक्‍तदान शिबिरांचे नियोजन युवासेनेकडून करण्यात आले आहे. तर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 7 डिसेंबरला विद्यार्थी कॉंग्रसेने रक्‍तदान शिबिराचे नियोजन केले आहे.

ठळक बाबी... 

  • राज्यात रक्‍ताचा तुटवडा; पाच ते सात दिवसांपर्यंत पुरेल इतकाच शिल्लक आहे रक्‍त साठा 
  • मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रक्‍तदान करण्याचे रक्‍तदात्यांना केले आवाहन 
  • कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे रक्‍तदान शिबिर 
  • युवासेनेचे वरुण सरदेसाई, विपुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात विठ्ठल वानकरांनी केले रक्‍तदान शिबिराचे आयोजन 
  • युवासेनेतर्फे 6 ते 11 डिसेंबरपर्यंत राज्यभर महारक्‍तदान शिबिरांचे आयोजन; विद्यार्थी कॉंग्रेसचीही सामाजिक बांधिलकी 
  • सोमवारी (ता. 7) दक्षिण सोलापुरातील कणबस (गं) येथे तर 9 डिसेंबरला निलम नगरात युवासेनेतर्फे रक्‍तदान शिबिर 

कोरोनाची महामारी अद्याप संपलेली नसून दरवर्षीप्रमाणे यंदा रक्‍तदार शिबिरांचे आयोजन होऊ शकलेले नाही. गणेशोत्सव, नवरात्र यासह अन्य सण- उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीही कोरोनामुळे साधेपणानेच साजऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे रक्‍तपेढ्यांमधील रक्‍त साठा कमी झाला आहे. रक्‍ताविना कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये या हेतूने मुख्यमंत्र्यांनी रक्‍तदानाचे आवाहन केले. त्यानंतर युवासेना अध्यक्ष तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, राज्य विस्तारक तथा सोलापुरचे संपर्कप्रमुख विपुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांच्या पुढाकारातून सोलापुरात महारक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कणबस (गं) येथे रक्‍तदान शिबिराचे नियोजन केले आहे. दक्षिण सोलापुरचे तालुकाध्यक्ष हरीष पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT