book selig in solapru  
सोलापूर

कोरोनामुळे महापरिनिर्वाणदिनी उलाढाल  घटल्याने पुस्तक विक्रेत्यांचीही निराशा 

अरविंद मोटे

सोलापूर : दरवर्षी 6 डिसेंबर रोजी ओसंडून वाहणाऱ्या पार्क चौकात यंदा तुरळक गर्दी होती. अनेक स्टॉलमधून होणारी पुस्तक विक्रींची लाखात होणारी उलाढाल काही हजार रुपयांची झाली. यंदा कोरोनामुळे महानिर्वानदिन होईल की नाही अशी शंका असतानाच भीमसैनिकांनी आंदोलनाचा इशारा देताच महापालिकेने पार्क चौकात मंडप घातला. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा नेहमीपेक्षा खूप कमी गर्दी होती. जेमतेम एक पुस्तक विक्रीचा स्टॉल होता. 

आंबेडकर जयंती व महापरिनिर्वाण दिन या दोन्ही दिवशी पार्क चौकात अनेक स्टॉल लागतात. काही लाखांची आर्थिक उलाढाल होते. मात्र यंदा केवळ एकाच पुस्तक विक्रेत्याचा स्टॉल होता. त्यातही दरवर्षीच्या तुलतनेने यंदा नव्वद टक्के उलाढालीत घट झाली. पार्क चौकात दर वर्षी चालणेही अश्‍यक्‍य असते. यंदा सकाळपासून विविध संघटनाचे पदाधिकारी व काही नागरिक वेगवेगळ्या वेळेत अभिवादन करून गेले. यामुळे कमी गर्दीत महापरिनिर्वाण दिन झाला. 

दरवर्षी या परिसरात छायाचित्रे व पुस्तक विक्रेत्यांची शेकडो दुकान सजतात. यंदा मात्र केवळ एक पुस्तक विक्रेता दोन-तीन छायाचित्रे व प्रतिमा विक्रेते, एक-दोन फुले विक्रेते होते. त्यांचीही उलाढाल म्हणावी तशी झाली नाही. 

पुस्तक विक्रेता दत्ता जाधव यांनी सांगितले की, माझे दरवर्षी पुस्तक विक्रीचे दुकान असते. माळशिरस तालुक्‍यातील लवंगहून सकाळी 9 वाजता आलो. मात्र पोलिसांनी पहिल्यांदा विरोध केला. गर्दी होणार नाही याची दक्षता घेईन. सर्व प्रकारची दुकाने आता सुरू झाली आहेत. मग पुस्तक विक्रीच का नको असे विचारल्यावर दुकान लावू दिले. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: नायरा एनर्जीच्या दरवाढीनंतर सरकारी कंपन्यांचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव किती?

शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचं धक्कादायक कृत्य! लग्नाच्या भूलथापा देत तरुणीचा ३ वर्ष लैंगिक छळ; तक्रार मिळताच आरोपीला अटक

Pune Teachers Constituency Election : भाजपला मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात डॉ. रोंगे यांचे बंड; विठ्ठलाचं दर्शन घेत अपक्ष म्हणून अर्ज भरण्यासाठी रवाना

Supriya Sule: ‘आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या’; दुष्काळावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

SCROLL FOR NEXT