ajit-pawar 
सोलापूर

बोरामणी विमानतळाचा उद्या (शनिवारी) फैसला ! 

तात्या लांडगे

सोलापूर : बोरामणी विमानतळासाठी आतापर्यंत 550 हेक्‍टर जमिनीचे संपादन करण्यात आले असून आणखी 28 हेक्‍टर जमिनीचे संपादन होणे बाकी आहे. विमानतळासाठी लागणारी जमीन संपादित करण्याचे प्रमुख काम महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे असून उर्वरित जमीन संपादनासंदर्भात उद्या (शनिवारी) मुंबईत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाल्यास पुढील कामे गतीमान होणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेत सोलापुरातील होटगी विमानतळाचा समावेश पहिल्या टप्प्यात झाला होता. परंतु, श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीसह अन्य अडथळ्यांची शर्यत संपलेली नसल्याने 'उडान' योजना कागदावरच राहिली. या पार्श्‍वभूमीवर आता महाविकास आघाडी सरकारने बोरामणी विमानतळ सुरु करण्याच्या हालचाली गतीमान केल्या आहेत. केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या पुढाकारातून बोरामणी विमानतळ मंजूर झाले. त्यानंतर तब्बल 100 कोटींचा खर्च करुन 550 हेक्‍टर जमिनीचे संपादनही करण्यात आले. मात्र, केंद्रातील सत्ता बदलानंतर बोरामणी विमानतळाचा प्रश्‍न प्रलंबितच राहिला. आता राज्य सरकारच्या माध्यमातून बोरामणी विमानतळासाठी प्रयत्न सुरु असून त्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. खासदार डॉ. सिध्देश्‍वर महास्वामीही त्यासाठी आग्रही आहेत. या पार्श्‍वभूमीवर शनिवारच्या बैठकीबाबत उत्सुकता लागली आहे. 


महाविकास आघाडीची पहिलीच बैठक 
युती सरकारच्या काळात बोरामणी विमानतळाच्या तुलनेत सर्वाधिक चर्चा अन्‌ बैठका होटगी रोडवरील विमानतळाचीच झाली. मात्र, दोन्ही विमानतळाचा प्रश्‍न प्रलंबितच राहिला. आता महाविकास आघाडी सरकारने बोरामणी विमानतळाबाबत पहिलीच बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीसाठी आमदार प्रणिती शिंदे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, बोरामणी विमानतळाचे व्यवस्थापक सज्जन निचळ, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष अनिल पाटील हे उपस्थित राहणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT