ajit-pawar 
सोलापूर

बोरामणी विमानतळाबाबत मोठा निर्णय...नक्‍की वाचा 

तात्या लांडगे

सोलापूर : बोरामणी विमानतळासाठी आतापर्यंत 550 हेक्‍टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. आता उर्वरित 28 हेक्‍टर जमिनीचेही संपादन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला दिले. त्यानुसार प्राधिकरणाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भूसंपादनाचा प्रस्ताव सादर केला आहे. 


होटगी रोडवरील विमानतळ सुरळीत होण्यास अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आता राज्य सरकारने बोरामणी विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. तत्पूर्वी, बोरामणी विमानतळासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्चून 550 हेक्‍टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. तर वन विभागाला पर्यायी 33 हेक्‍टर जमीन देण्याचा प्रस्तावही जिल्हाधिकारी स्तरावरून नागपूर कार्यालयास सादर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भूसंपादनासाठी 50 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानुसार आता विमानतळ विकास प्राधिकरणाने भूसंपादनाची कार्यवाही सुरू करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. दरम्यान, यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यांची यादीही तयार करण्यात आली आहे. आता त्यांच्या संमतीने भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादनाचा प्रस्ताव 
सरकारच्या निर्देशानुसार बोरामणी विमानतळासाठी लागणाऱ्या उर्वरित जमिनीच्या संपादनाची कार्यवाही सुरू करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करून थेट तथा वाटाघाटीद्वारे संपादनाची कार्यवाही जिल्हाधिकारी स्तरावरून पूर्ण केली जाईल. 
- अनिल पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण, मुंबई 

ठळक बाबी... 

  • जमिनीचे संपादन होणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार होणार 
  • वाटाघाटीद्वारे जमीन देण्यास तयार असलेल्यांचे प्राधान्याने होणार भूसंपादन 
  • शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या म्हणण्यानुसार होणार जमिनीची थेट खरेदी 
  • जिल्हाधिकारी घेणार संबंधित शेतकऱ्यांची बैठक : भूसंपादनाची कार्यवाही होणार मार्चपूर्वी पूर्ण 
  • भूसंपादनानंतर भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाकडून होणार पाहणी : रन-वे कामाला त्यानंतर प्रारंभ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Was Dr. Manisha Jejurkar? नाशिक हादरलं! प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ मनीषा जेजूरकर यांनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य, डॉक्टर नवरा घरात नसताना...

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

SCROLL FOR NEXT