Aniket 
सोलापूर

बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात वाळूज येथील मुलाचा मृत्यू ! वाळूज व देगाव परिसरात भीतीचे वातावरण 

रमेश दास

वाळूज (सोलापूर) : बिबट्यासदृश प्राण्याने मंगळवारी (ता. 26) केलेल्या हल्ल्यात वाळूज (ता. मोहोळ) येथील दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे मोहोळ तालुक्‍यातील वाळूज, देगाव, मनगोळी, भैरववाडीसह नरखेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अनिकेत अमोल खरात (वय 10) असे त्या मुलाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्‍टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसांत झाली आहे. 

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार व मृत मुलाचे चुलते अविनाश भागवत खरात यांनी दिलेल्या माहितीवरून, मंगळवारी (ता. 26) सायंकाळी 4.30 वाजण्यादरम्यान अर्जुन, आशीष व अनिकेत अमोल खरात असे तिघेजण खरात वस्तीवरील घराच्या पाठीमागे खेळत होते. त्या वेळी त्यांचे नातेवाईक बाजूच्या कांद्याच्या शेतामध्ये काम करीत होते. त्या वेळी मुले घराच्या मागील पटांगणात खेळत होती. साधारण सायंकाळी साडेचार ते पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मुले मोठमोठ्याने ओरडू लागली व त्या वेळी कुत्रीसुद्धा मोठमोठ्याने भुंकू लागली म्हणून नातेवाईक तिकडे पळत गेले असता, मुलांनी सांगितले की, अनिकेतला मोठ्या तोंडाच्या व त्याच्या अंगावर ठिपके असलेल्या प्राण्याने मक्‍याच्या शेतामध्ये हल्ला करून ओढून नेले आहे. 

तेव्हा जवळच असलेल्या मक्‍याच्या शेतात जाऊन पाहिले असता कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तो प्राणी पळून गेला होता व अनिकेत हा जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात मक्‍याचे शेतामध्ये पडला होता. त्या वेळी अनिकेतचे चुलते व भाऊ अजित याने पाहिले असता अनिकेतच्या डोक्‍याच्या पाठीमागील बाजूस मोठ्या फाटल्याच्या जखमा होऊन त्यातून रक्तस्राव झाला होता. त्यांनी लगेच गावातील पोलिस पाटील अर्चना अनिल कादे, गाव कामगार तलाठी श्री. पारडे व इतर लोकांना सांगून अनिकेतला औषध उपचारासाठी सरकारी दवाखान्यात नेले. तेथे डॉक्‍टरांनी त्यास तपासून तो मृत झाल्याचे सांगितले. या घटनेचा पुढील तपास नरखेड पोलिस ठाण्याचे अंमलदार गणेश पोफळे करीत आहेत. 

ठळक... 

  • वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंधार पडल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता कोणत्या प्राण्याने हल्ला केला हे अद्याप समजू शकले नाही.
  • बुधवारी सकाळी वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा पाहणी करणार आहेत. 
  • घटनास्थळी मोठा रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. 
  • अनिकेतच्या डोक्‍याच्या मागील बाजूस दोन सुळे घुसल्यासारख्या मोठ्या खुणा असून, डोक्‍यावर नखांनी फाडल्यासारख्या तीन- चार खुणा आहेत. 

बिबट्या हा प्राणी त्याच्यापेक्षा उंचीने कमी असलेल्या प्राण्यावर किंवा प्राणी समजून लहान मुलांवर हल्ला करतो. वाळूज परिसरातील लोकांनी सावध राहून काळजी घ्यावी. वस्तीच्या सर्व बाजूला विजेचे मोठे दिवे लावावे. शेळ्या, लहान वासरे व मोठी जनावरे गोठ्यात किंवा बंदिस्त जागेत बांधावीत. 
- भरत छेडा, 
नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Ganesh Visarjan Live: लालबागच्या राजाची आरती सुरू

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

SCROLL FOR NEXT