corona 
सोलापूर

ब्रेकिंग...सोलापूर जिल्ह्यातील 13 पैकी 11 आमदारांची झाली कोरोना चाचणी 

प्रमोद बोडके

सोलापूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून (सोमवार) सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विधानपरिषद व विधानसभा सदस्यांची कोरोना चाचणी करण्याची सूचना विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद व विधानसभेच्या सदस्यांची शनिवारी व रविवारी कोरोना करण्यात आली आहे.

विधानपरिषदेचे दोन व विधानसभेचे 11 असे एकूण 13 आमदार सोलापूर जिल्ह्यात आहेत. त्यापैकी 11 आमदारांनी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 
या कोरोना चाचणीतून काय समोर आले? कोरोना चाचणी न झालेले दोन आमदार कोण? याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. कोरोना चाचणी झालेल्या व न झालेल्या आमदारांची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने विधानमंडळ सचिवांकडे पाठविण्यात आली आहे.

अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आमदारांना कोरोना चाचणी वेळेत करता यावी, या चाचणीचा अहवाल वेळेत मिळावा यासाठी आज रविवारी जिल्ह्यातील आरटी-पीसीआरच्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळाही सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले होते. त्यामुळे आज रविवारच्या दिवशीही ही प्रयोगशाळा सुरू होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: कर्जाच्या डोंगरामुळे तरुण शेतकऱ्याने दिला जीव

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT