IMG-20210306-WA0268.jpg 
सोलापूर

Breaking ! अक्‍कलकोट रोडवरील विणकर वसाहत परिसरात आग; जेवायला गेलेले 70 कामगार सुरक्षित; 50 लाखांहून अधिक नुकसान 

तात्या लांडगे

सोलापूर : दुपारची साडेतीनची वेळ होती, सर्व कामगार जेवणासाठी कारखान्याबाहेर पडले होते. अक्‍कलकोट एमआयडीसी रोडवरील विणकर वसाहत परिसरातील साईराम पॉलिमर कारखान्याजवळ लाईटचा मोठा स्पार्क झाला. त्यावेळी त्याच्या ठिणग्या खाली पडल्या आणि सूताने पेट घेतला. 60 ते 70 कामगार असतानाही त्यांना आग आवरता आली नाही. त्याचवेळी एकाने अग्निशामक विभागाला कॉल केला आणि लागलीच त्याठिकाणी अग्निशामकच्या चार गाड्या पोहचल्या. एक तासानंतर आग आटोक्‍यात आली. या आगामी अंदाजित 50 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशामक विभागप्रमुख केदार आवटे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

अग्निशामक विभागप्रमुख केदार आवटे म्हणाले... 

  • आगीचे कारण : सुस्पष्ट कारण समजले नाही 
  • आगीतील नुकसान : अंदाजित 50 लाख 
  • मालक : तीन युनिट डब्लिंग, पॉलिमरसह अन्य एक युनिट 
  • किती गाड्या पाणी लागले : बारा ते पंधरा गाड्या 
  • आग आटोक्‍यात येण्यासाठीचा कालावधी : साडेतीन ते साडेचार 
  • आग लागली तेव्हा त्याठिकाणी काय काम सुरु होते : तीन सलग कारखाने असून त्याठिकाणी लाईटचा स्पार्क झाला आणि खाली सूत आल्याने आग आवरता आली नाही. 

आग लागलेल्या कारखान्याअंतर्गत तीन युनिट असून त्या युनिटचे मोठे नुकसान झाले असून साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशामक विभागाच्या चार गाड्यांमध्ये खासगी टॅंकरच्या सहायाने पाणी पोहच करण्यात आले. त्यावेळी साडेतीन ते साडेचार या वेळेत आग विझविण्यात अग्निशामक विभागाला यश मिळाले. सध्या केदार आवटे हे त्याठिकाणी उपस्थित कामगारांकडून आगीबद्दल सविस्तर माहिती घेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talathi Bharti 2026: अखेर तलाठी भरती जाहीर! MPSC कडून 5,707 पदांसाठी जाहिरात; अर्ज कुठे, कसा अन् कधीपर्यंत करायचा? जाणून घ्या

Mumbai Tiranga March : मुंबईत २६ जुलैला तिरंगा मोर्चा, आदित्य अन् अमित ठाकरेंचे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन

Latest Marathi Update : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रमुख सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Jantar Mantar Protest : "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" जंतर-मंतरवर पोहोचलेल्या 78 वर्षीय मराठी डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल, NEET आंदोलनात विद्यार्थ्यांना देताहेत साथ

Student Protest: भीतीपेक्षा मोठा होता विद्यार्थ्यांचा आवाज! घरच्यांना न सांगता जंतरमंतरवर पोहोचली नम्रता; आंदोलनात झाली सहभागी

SCROLL FOR NEXT