0Crime_Sakal_0.jpg 
सोलापूर

Breaking ! बाजार समितीत हमाली करणाऱ्या तरुणाचा दहिटणे परिसरात खून; दुचाकीवर घेऊन गेलेल्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

तात्या लांडगे

सोलापूर : बाजार समितीत हमाल म्हणून काम करणाऱ्या सलिम शेख याच्या डोक्‍यात धारधार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. खूनाचे नेमके कारण अजून अस्पष्टच असून जोडभावी पेठ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

पोलिसांनी सुरु केला खूनाचा तपास 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल म्हणून काम करणाऱ्या सलिम शेख (वय 32) या तरुणाचा खून झाल्याची घटना आज दहिटणे परिसरात घडली आहे. जोडभावी पेठ पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून साडेसहाच्या सुमारास खूनाची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्‍त कमलाकर ताकवले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी सोडा, पाण्याची बाटली आणि रिकामा ग्लास आढळला. हत्याराचा शोध घेतला, परंतु ते मिळाले नाही. दरम्यान, जो तरुण सलिमला दुचाकीवरून घेऊन गेला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सखोल चौकशी असल्याची माहिती भालचिम यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

सलिम हा त्याच्या ओळखीच्या तरुणासोबत दुचाकीवरून त्याठिकाणी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या संशयातून जोडभावी पेठ पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दहिटणे परिसरातील दर्ग्याजवळ ही घटना घडली असून कच्च्या रोड परिसरातील वडाच्या झाडाखालीच सलिमचा खून करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच, जोडभावी पेठ पोलिस त्याठिकाणी पोहचले. त्यावेळी काही वेळापूर्वीच खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांना आला. मृताची ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आता पोलिस पुढील तपास करीत असून सलिमचा खून का करण्यात आला, त्यामागे नेमके कोण-कोण आहेत, याचाही शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Domestic Violence : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने भररस्त्यात हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याची धमकी

Loni Kalbhor Crime: कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार लोणी काळभोरमध्ये पोलिसांच्या सापळ्यात

SCROLL FOR NEXT