3sakal_exclusive_1.jpg 
सोलापूर

मोठी बातमी ! सात तालुक्‍यांतील सरपंच निवडी लांबणीवर; चार तालुक्‍यांतील निवडी वेळापत्रकानुसारच

तात्या लांडगे

 सोलापूर : जिल्ह्यातील सात तालुक्‍यांमधील 14 गावांमधून 15 याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यानुसार संबंधित गावांच्या सरपंच आरक्षणासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन जिल्हाधिकारी मंगळवारी (ता. 9) सुनावणी घेणार आहेत. 16 फेब्रुवारीपर्यंत त्यावर निर्णय देणे अपेक्षित असून आरक्षणात बदल झाल्यास अन्य गावांचेही आरक्षण बदलाची शक्‍यता आहे. त्यामुळे या गावांचा निर्णय झाल्यानंतरच सात तालुक्‍यातील सरपंच निवडी करण्याचा निर्णय विचाराधिन आहे. त्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आज (सोमवारी) अंतिम निर्णय घेणार आहेत.

'या' सात तालुक्‍यांतील सरपंच निवडी लांबणीवर 
सरपंच आरक्षण चुकीच्या पध्दतीने जाहीर झाल्याबद्दल सात तालुक्‍यातील 14 गावांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने निकाल दिला असून त्यानुसार आता जिल्हाधिकारी कार्यवाही करणार आहेत. त्यात अक्‍कलकोट, माढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ या तालुक्‍यातील प्रत्येकी एक तर सांगोल्यातील चार आणि माळशिरस व पंढरपूर तालुक्‍यातील प्रत्येकी तीन गावांमधून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आले आहेत. एका गावाचे सरपंच आरक्षण बदलल्यास काही गावांचे आरक्षण बदलण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या पंढरपूर, सांगोला, मोहोळ, अक्‍कलकोट, माढा, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर या सात तालुक्‍यांमधील सरपंच निवडी काही दिवस लांबणीवर पडणार आहेत. त्यावर जिल्हाधिकारी शंभरकर हे कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन सोमवारी अंतिम निर्णय घेतील. 


सोलापूर जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायतींसाठी नुकतेच मतदान झाले असून मतमोजणीनंतर सरपंच निवडीचा कार्यक्रमही निश्‍चित झाला. 9, 11 आणि 13 फेब्रुवारी ही नियोजित तारीख असून नवनिर्वाचित सदस्यांना निवडीच्या अनुषंगाने नोटीसही देण्यात आली. दरम्यान, सदस्य पळवापळवीच्या भितीने दूरगावी गेलेल्यांनीही काही वेळासाठी गाव गाठले आणि नोटीस घेऊन पुन्हा फिरायला गेले आहेत. मात्र, आता सात तालुक्‍यांमधील सरपंच निवडीचा कार्यक्रम पुढे जाणार असल्याने त्यांचा मुक्‍काम आणखी वाढला आहे. दरम्यान, उत्तर सोलापूर, करमाळा, बार्शी, मंगळवेढा या तालुक्‍यातील सरपंच निवडी मात्र, ठरलेल्या वेळेतच घेण्याचे नियोजन आहे. त्यावरही जिल्हाधिकारी उद्या (सोमवारी) निर्णय घेतील, असे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सरपंच निवडीसंदर्भातील उलटसुलट चर्चा आणि संभ्रमास पूर्णविराम मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

SCROLL FOR NEXT