3Ujani_20Dam1.jpg 
सोलापूर

Breaking ! उजनीतून 2 एप्रिलला पाणी सोडण्याचे नियोजन; धरणात 69 टक्‍के पाणीसाठा

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरणात सध्या 69 टक्‍के पाणीसाठा असून प्लसमध्ये 37 टीएमसी पाणी शिल्लक आहे. उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडल्यास धरणातील पाणीसाठा मायनस 28 टक्‍क्‍यांपर्यंत जाण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज पाहून उन्हाळ्यात यंदा एक रोटेशन सोडण्याचे नियोजन सुरु असून 2 एप्रिल ते मेअखेर असे पाणी सोडले जाईल. परंतु, त्यासंबंधीचा अंतिम निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

ठळक बाबी... 

  • धरणात सध्या आहे 37 टीएमसी (मृतसाठा वगळता) पाणी 
  • उन्हाळ्यात एक रोटेशन सोडल्यास धरणाची पाणीपातळी मायनस 6 टक्‍क्‍यांपर्यंत खाली जाणार 
  • दोन रोटेशन सोडल्यास धरणातील पाणीसाठा 28 टक्‍क्‍यांपर्यंत मायनस होईल 
  • 1 मार्च ते 30 जून (उन्हाळी हंगाम) या काळात शेतीसाठी एक रोटेशन की दोन रोटेशन सोडायचे निर्णयात सावधगिरी 
  • 2 एप्रिल ते 31 मेपर्यंत कालवा, बोगद्यातून पाणी सोडण्याचे नियोजन; कालवा सल्लागार समिती घेणार निर्णय 

मागच्या वर्षी लाभक्षेत्रात, जिल्हाभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरण हाऊसफुल्ल भरले. मात्र, शहरासाठी नदीतून पाणी सोडणे, रब्बीसाठी एक आवर्तन पाणी सोडले आणि बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा आता खालावला आहे. आठमाही असलेल्या या प्रकल्पातून ऊस वगळता रब्बी पिकांसाठीच पाणी सोडण्याची तरतूद आहे. मात्र, जिल्ह्यातील वाढलेली कारखानदारी आणि शेतकऱ्यांनी बदललेल्या पीक पध्दतीमुळे उसासाठीदेखील पाणी सोडले जात आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींची मागणी शासन स्तरावर जोर धरून आहे. 'धरण उशाला अन्‌ कोरड घशाला' हे समीकरण बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करणे, पीक पध्दतीत बदल करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. दरवर्षी धरण 100 टक्‍के भरुनही उसामुळे पावसाळ्यापूर्वीच धरण मायनसमध्ये जाते हा अनुभव जुनाच आहे. पाऊस लांबणीवर पडल्यानंतर लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर आता उन्हाळ्यातदेखील यंदा एकच रोटेशन सोडले जाण्याची शक्‍यता आहे. 

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय 
धरणात सध्या 69 टक्‍क्‍यांपर्यंत पाणी असून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उन्हाळ्यातील रोटेशनचे नियोजन होईल. पाऊस लांबणीवर पडल्यास धरणात शिल्लक पाणीसाठा असावा, या दृष्टीने नियोजन केले जात आहे. 
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Vivo X Fold 6 ची भारतात एन्ट्री! 'या' दिवशी होणार लाँच; 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स!

Badminton Association: महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण लखानी

SCROLL FOR NEXT