bride and groom gold jewellery stolen from wedding hall solapur crime police Sakal
सोलापूर

Solapur Crime : वधू-वरांचे दागिने मुहूर्ताच्या अगोदरच लंपास; सदाशिवनगरच्या मंगल कार्यालयातून साडेपाच लाखांची चोरी

दोन वधू-वरां सोने व चांदीचे दागिन्यांवर लग्न मुहूर्ताच्या अगोदरच चोरट्याने डल्ला मारला.

सकाळ वृत्तसेवा

माळशिरस : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील शिवामृत भवन मंगल कार्यालयात वधू-वरांचे साडेपाच लाखाचे दागिने चोरट्याने पळविल्याने एकच धांदल उडाली. दोन वधू-वरां सोने व चांदीचे दागिन्यांवर लग्न मुहूर्ताच्या अगोदरच चोरट्याने डल्ला मारला.

भारत बाजीराव कोळेकर (रा. जळभावी, ता. माळशिरस) यांचा मुलगा विनोद आणि उद्धव अप्पासाहेब शेंडगे (रा. वाटलूज, ता. दौंड) यांची सुकन्या तृप्ती तसेच भारत बाजीराव कोळेकर (रा. जळभावी, ता. माळशिरस) यांचा मुलगा विष्णू व सुरेश रामचंद्र वाघमोडे (रा. बांगर्डे) यांची मुलगी दीप्ती यांचा विवाह सोहळा सदाशिवनगर येथील शिवामृत भवन मंगल कार्यालयात ता. ६ रोजी दुपारी संपन्न होणार होता.

नववधूंचे दागिने कोळेकर परिवाराकडे होते. त्यांनी नववधूंना सोन्याचे मंगळसूत्र, गंठण आदी दागिने, चांदीची जोडवी, पैंजण असे दागिने केलेले होते. नवरदेवांना सोन्याच्या अंगठ्या, असे सर्व दागदागिने असणारी पिशवी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चोरट्याने लंपास केली.

पिशवी गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शोधाशोध केली. परंतु, दागिने असणारी पिशवी हाती लागलेली नाही. माळशिरस पोलिस स्टेशनमध्ये महावीर कोळेकर (रा. जळभावी) यांनी फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: कोकणात जन्म; अनेक पदे भुषवली, पण स्वातंत्र्य लढ्यातील वक्तव्यानं अनभिषिक्त...; ठाकरेंनी उल्लेख केलेले स.का.पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT