yuva new.jpg
yuva new.jpg 
सोलापूर

युवा गंधर्व पुरस्काराचे शानदार वितरण 

अनुराग सुतकर

सोलापूर : संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना देण्यात येणारा युवा गंधर्व पुरस्कार देण्यात आला. 
संगीत प्रतिभा महोत्सवात सुंद्रीवादन, कथ्थक, भरतनाट्यम, मोहिनी अट्टम आदी विविध कलाप्रकारांतून संगीत सादर करण्यात आले. या प्रतिभा महोत्सवाचे उद्‌घाटन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी आयोजक भिमण्णा जाधव, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, नंदिनी शिंदे, शिवाजी सुरवसे, नृत्य कलाकार मयूर वैद्य, रामेश्‍वर गुरव, गुरुनाथ जाधव, गोरखनाथ जाधव, संतोष कोथळीकर उपस्थित होते. व्यंकटेश माने, गुरुनाथ जाधव, ऋषिकेश बदामीकर, आदित्य खाडवे, अंजना शर्मा या कलाकरांनी भरतनाट्यम, सामुहिक नृत्य, कथ्थक, शास्त्रीय गायन, सुंद्रीवादन हे कलाप्रकार सादर करुन प्रेक्षकांची दाद मिळवली. लंडनच्या संगीत संग्राहलयातून मिळालेल्या सुंद्रीसम्राट सिद्राम जाधवांची सुंद्रीवादनाची व्हॉईस क्‍लीप सादर करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन जगदीश पाटील यांनी केले. 

पुरस्काराचे मानकरी 
हा पुरस्कार बासरीवादक निनाद मुळगांवकर, कोलकत्याचे सितारवादक कल्याण मुजमदार, दिल्लीच्या प्रसिध्द नृत्य कलाकार मलाविका अजितकुमार, मुंबईच्या पूजा मोरे आणि सई कानडे, शास्त्रीय गायक आदित्य खाडवे, बेळगावचे हार्मोनियम वादक सारंग कुलकर्णी, बेंगलूरच्या भरतनाट्य कलाकार अंजना शर्मा, पुण्याच्या वैष्णवी सुंदरम, सोनवी मेहेंदळे, सानिका जोशी यांना देण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT