Brother committed suicide because he did not right clothes at his sisters wedding 
सोलापूर

बहिणीच्या लग्नात मनासारखी कपडे घेतली नसल्याने भावाने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : बहिणीच्या लग्नात मनासारखी कपडे घेतली नसल्याचा राग मनात धरून नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन डोंगरगाव (ता. मंगळवेढा) येथील नीलेश दत्तात्रय हेंबाडे (वय 19) या तरुणाने आत्महत्या केली. सदरची घटना मंगळवारी (ता. १६) सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.
निलेश दत्तात्रय हेंबाडे हा सांगोला तालुक्यातील कडलास येथे दूध डेरी डिप्लोमाचे प्रशिक्षण घेत आहे. लॉकडाऊनमुळे तो तीन महिन्यापासून घरी बसून आहे. सोमवारी त्याच्या बहिणीचे लग्न झाले. या लग्नामध्ये त्याच्या मनासारखे कपडे घ्यावे, यासाठी त्यांचा आग्रह होता. स्वभावाने रागीट असलेल्या निलेशने पसंतीच्या कपड्यासाठी हट्ट धरला. परंतु या लग्नामध्ये आई- वडिलांनी त्याच्या मनासारखी कपडे घेतले नसल्याचा राग मनात धरून त्याच्या घराशेजारी असणाऱ्या शफोद्दीन इनामदार या शेतकऱ्याच्या शेतात असणाऱ्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची खबर त्याच्या नातेवाईकांना सुनील संजय डोंगरे यांनी दिली. त्यावेळी त्याचे आई वडील आजोबा सर्वांनी जाऊन घटनास्थळी जावून त्याचा गळफास सोडवून उपचारासाठी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले. पोलिसात या घटनेची खबर आजोबा ज्ञानू दाजी हेबांडे (वय 71) यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC बंडखोरांना राज्यात १३०० मतं मिळवू न शकलेल्या पक्षाचा आधार, शून्यावरून थेट २० खासदार; NCPIचा इतिहास काय? कोण चालवतं?

सरळसेवा पदभरतीची महत्त्वाची फाईल गहाळ, राजशिष्टाचार विभागात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Nashik Leopard Sighting : नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक तब्बल 3 बिबटे? 10 वीच्या विद्यार्थ्याने कॅमेऱ्यात कैद केला थरार; पण वन विभाग म्हणतंय...

Vaibhav Sooryavanshi: आयपीएल २०२६ चा ऑरेंज कॅप विजेता वैभव सूर्यवंशी कसा बनला 'रन मशीन'? बालपणीच्या कोचने उघड केला 'तो' कठीण प्रवास!

SCROLL FOR NEXT