SMC 
सोलापूर

महापालिकेचा शुक्रवारी अर्थसंकल्प ! सत्ताधारी नगरसेवकांची नाराजी दूर करण्यास प्राधान्य; गाळे भाडेवाढीचा होणार निर्णय? 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनामुळे लांबणीवर पडलेले बजेट आता शुक्रवारी (ता. 29) मांडण्याचे निश्‍चित झाले आहे. यंदा उद्दिष्टाच्या तुलनेत महापालिकेला अपेक्षित कर मिळालेला नाही. जानेवारीअखेर 200 कोटींपर्यंत करवसुली अपेक्षित असतानाही अवघे 70 कोटी रुपये मिळाले आहेत. तरीही मार्च 2021 पर्यंतच्या अंदाजित वसुलीनुसार बजेट मांडले जाणार आहे. सत्ताधारी भाजपने दोन- तीनवेळा पार्टी मीटिंग घेऊन बजेट निश्‍चित केले आहे. पहाटे तीन वाजेपर्यंत बजेट मीटिंग चालल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

सत्ताधारी नगरसेवकांची नाराजी दूर करणे आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नागरिकांसाठी कोणत्या बाबींवर प्राधान्याने खर्च अधिक व्हायला हवा, याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. विस्कळित पाणीपुरवठा आणि नगरसेवकांना भांडवली निधी, या प्रमुख बाबींवर सर्वाधिक खर्च केला जाईल, अशीही चर्चा आहे. 2020-21 च्या वार्षिक बजेटमध्ये शहरातील (एबीडी एरिया) नगरसेवकांचा भांडवली निधी कमी करून हद्दवाढ भागातील नगरसेवकांना दिला जाणार आहे. तो निधी नगरसेवकांच्या प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईटसह अन्य कामांसाठी वापरला जाणार आहे. मात्र, शहरातील नगरसेवकांना तो निर्णय मान्य होईल का, महापालिकेवरील दायित्व वाढणार असल्याने सत्ताधाऱ्यांचे बजेट प्रशासन (महापालिका आयुक्‍त) मान्य करेल का, असे प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत. 

गाळ्यांच्या भाडेवाढीच्या निर्णयाकडे लक्ष 
शासनाच्या नव्या आदेशानुसार सध्याचा रेडिरेकनर दर विचारात घेऊन गाळेधारकांच्या भाड्यात वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र, कोरोनाचा काळ आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने उत्पन्नवाढीच्या मुद्‌द्‌यांना सत्ताधाऱ्यांनी बगल देऊन बजेट तयार केल्याची चर्चा आहे. तर निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेले नियमित तथा एक- दोन दिवसांआड पाण्यासंदर्भात, ड्रेनेज, रस्ते या बाबींनाच सर्वाधिक निधी दिला जाईल. दुसरीकडे गाळ्यांची भाडेवाढ केल्यास गाळेधारकांच्या नाराजीचा फटका आगामी निवडणुकीत बसेल, अशीही भीती सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे गाळ्यांच्या भाडेवाढीसंदर्भात बजेटमध्ये काहीच उल्लेख नसल्याचीही चर्चा आहे. याबाबतीत सत्ताधारी काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT