Bulk Drugs Park Sakal media
सोलापूर

Bulk Drugs Park : बल्क ड्रग्ज पार्क योजनेतून महाराष्ट्र वगळला

तेरा राज्यापैकी गुजरात, हिमाचल प्रदेश व आंध्र प्रदेशला संधी

प्रकाश सनपूरकर

सोलापूरत : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असल्याचा मुद्दा वादात असताना केंद्राने बल्क ड्रग्ज पार्क मंजूर केल्यानंतर अवघ्या एक महिन्यात गुजरात सरकारने उभारणीची तयारी करून महाराष्ट्रातील उद्योजकांनाच या पार्कमध्ये उद्योग उभारणीचे निमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने १३ राज्यांच्या प्रस्तावातून महाराष्ट्राचा प्रस्ताव या योजनेतून वगळत गुजरात, आंध्रप्रदेश व हिमाचल प्रदेशाला योजना मंजूर केली आहे.

मागील काही महिन्यापासून महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याच मुद्दा वादात सापडला आहे. या वादातून सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. नव्यानेच स्थापन झालेले राज्य सरकार या प्रकरणाने कोंडीत सापडले आहे.

औषध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या कच्च्या मालाला बल्क ड्‍ग्ज, असे म्हटले जाते. भारतीय औषध उद्योग जगातील तिसरा सर्वात मोठा उद्योग आहे. भारताने २०२१-२२ या आर्थिक वर्षात एक लाख ७५ हजार ४० कोटी रुपयांची औषधे निर्यात केली. ज्यात मोठ्या प्रमाणात औषधे व ड्रग इंटरमीडिएट्सचा समावेश आहे. भारत हा जगातील अॅक्टिव्ह मेडिसिनल कॉम्पोनंट्स (एपीआय) किंवा मोठ्या प्रमाणात औषधांच्या उत्पादकांपैकी एक आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात बल्क ड्र्ग्जची आयात देशाला करावी लागते. या आयातीवरील अवलंबन कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आखली आहे.

एकूण १३ राज्यांनी यासाठी त्यांचे प्रस्ताव निती आयोगाकडे पाठवले होते. त्यापैकी केवळ गूजरात, हिमाचल प्रदेश व आंध्र प्रदेश राज्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. यातून महाराष्ट्र वगळला गेला आहे. या पार्कमध्ये पायाभूत सुविधाच्या उभारणीचा ७० टक्के खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. तसेच त्यासाठी या तीनही राज्यांनी जागेचे प्रस्ताव देखील सादर केल्याने लगेचच प्रक्रिया सुरु झाली आहे. गुजरात इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (जीआयडीसी)ने तत्काळ महाराष्ट्रातील उद्योजक व कारखानदार संघटनांना जंबूसर भरूच (गुजरात) येथे उभारण्यात येणाऱ्या बल्क ड्ग्ज पार्कच्या शिलान्यासासाठी निमंत्रित केले आहे. सोमवारी (ता. १०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा शिलान्यास होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा ठाणेकरांना दिलासा! १०० कोटींची देणी थकीत, अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

Australia Cricket: खेळपट्टी तयारीत लुडबुड नसणार; आर्थिक फटका बसल्यानंतर ऑस्ट्रेलियन मंडळाचा पवित्रा

Santwadi Leopard News: संतवाडीत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद; जन्नुर तालुक्यातील घटना, शेतावर वनविभागाने पिंजरा लावला अन्..

SCROLL FOR NEXT