Call of the Corona virus mother goes viral 
सोलापूर

तु आल्याशीवाय मी जेवणार नाही की, पाणी सुद्धा पिणार नाही; कोरोनाच्या भितीने आईचा ह्रदयस्पर्शी मुलाला कॉल

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.  पुण्यातही रुग्ण अढळून आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात याबाबत भिती निर्माण झाली असून पु्णे, मुंबईला असलेल्या नातेवाईकांची विचारपुस केली जात आहे. यातच पुण्यातील एका मुलाला त्याच्या आईने गावाकडून केलेला कॉल सोशल मीडियार चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात माझ्या राजा तू आताच्या आता पुण्यातून गावाकडं ये, मी तुझ्या पाया पडते, अशी विनवणी आई मुलाकडे करत आहे. डोळ्यात पाणी आणणारा हा कॉल चर्चेचा ठरला आहे. 

काय म्हणते ती ‘आई’?
मुलगा : हेलो मम्मी!
आई : हा! तू आताच्या आता गावाकडे परत ये आणि हे सर्व संपलं की मग जा परत माघारी
मुलगा : ठीक आहे…, तू ते टीव्हीमध्ये बघितलं व्हयं?
आई : हो! टीव्हीला देतयं की, टीव्हीला सांगतयं की…, माणसं मारुन टाकतिया…, झाला आहे रोग त्याचा इलाजही नाही, त्याचा उपचारसुद्धा नाही….
मुलगा : बरं… बरं…, बघू मग
आई : नको बाबा! येरं राजा घरी…, ये मी तुला आयुष्यभर करुन घालती घरी बसून…
मुलगा : बरं… बरं…
आई : तू निघ आता…, नाश्ता केला की निघ बाबा…
मुलगा : हो…
आई : आणि इथं घरी झोपून खा, मी तुला एक शब्दसुद्धा बोलत नाही…, मी करुन घालती तुला रोज…
मुलगा : बरं… बरं…
आई : निघायचं बघ लवकर…, तोंडाला रुमाल बांधून बाहेर पड…
मुलगा : अग मम्मी…, तुझं बरोबर आहे. पण, आपल्याला पोरी कोण द्यायचं लग्नाला बसून राहिल्यावर…
आई : बघू…, हे एवढे एक दोन महिने जाऊ दे…, मग जा परत हे संपलं म्हणजे…, डोस देऊन मारतात ती माणसं, असं टीव्हीला दावतियां…. तू निघायचं बघ… आपल्याला नाही राहायचं तिथं, महिन्या दोन महिन्यांनी या रोगाचा निदान झाल्यावर मग परत आणिक जा तू…. तू लगेच निघ आता, तोंडाला रुमाल बांधून यं…
मुलगा : हा…
आई : कपडे घेऊन ये आणि आला की घरात कपडे नेऊ नको…, टाकीपाशी ठेव, मी उद्या त्याला चांगलं धुवीन औषधी घालून….
मुलगा : बरं… बरं…
आई : हा…, तू आल्याशिवाय मी जेवणार पण नाही आणि पाणीसुद्धा पेणार नाही…
मुलगा : नाही नाही…, येतो मी आज
आई : ठेऊ का मग…?
मुलगा : हा… हा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT