car caught fire due to battery failure at solapur highway police traffic  sakal
सोलापूर

Car Accident : सोलापूर महामार्गावर चालत्या कारने घेतला पेट ! कार जळून खाक

मोहोळहुन -सोलापूर कडे जाणाऱ्या महामार्गावर चालत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे कार जळून खाक

चंद्रकांत देवकते

मोहोळ : मोहोळहुन -सोलापूर कडे जाणाऱ्या महामार्गावर चालत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे कार जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

याबाबत अधिक वृत्त असे की श्रीकांत कांबळे रा. माढा . जि. सोलापूर हे माढ्याहुन मोहोळमार्गे सोलापूरला स्वताच्या पेट्रोल कारने IKON ( MH 12 CK 8244) जात असताना अचानक कोळेगांव पाटीजवळ हॉटेल सुगरणसमोर त्यांना बॉनेटमधुन धुर येत असे दिसले.

तात्काळ त्यांनी रस्त्याच्या कडेला कार थांबविली व कारच्या खाली उतरले . तोप्रर्यत बॉनेटमधुन अधिक धुर येत त्यातुन आगीचे लोट दिसु लागले .

कांबळे यांनी आसपास थांबलेल्या एक दोन नागरिकांच्या मदतीने जवळच्या एका शेतकऱ्याच्या वस्तीवरून बादलीने पाणी आणुन आग विझविण्याच्या प्रयत्न केला . पण तोपर्यत आगीने उग्र रूप धारण करून कार भस्मसात झाली.

दरम्यान घटनास्थळी श्रीकांत कांबळे यांच्याशी सकाळ बातमीदाराने संपर्क साधला असता कारमधील बॅटरी खराब झाल्यामुळे कारने पेट घेतला असावा अशी शंका व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT