सोलापूर

सावधान.. आपल्या फोटोंसोबत होऊ शकते मोर्फिंग! 

परशुराम कोकणे

सोलापूर : लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर टाइमपास म्हणून सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड सुरू आहेत. गेल्या आठ दिवसांपासून व्हॉट्‌सऍप, फेसबुकवर अनेकजण आपले वैयक्तिक फोटो शेअर करत आहेत. या माध्यमातून आपले फोटो डाऊनलोड करून एडिट करून बदनामी केली जाऊ शकते. म्हणजेच मोर्फिंग केले जाऊ शकते, असे प्रकार टाळण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन, संचारबंदी केल्याने सर्वजण घरात आहेत. आपला वेळ घालवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याचाच गैरफायदा घेत अनेक हॅकर्सनी सोशल मीडियावर वेगवेगळे टास्क तयार करून पाठवत आहेत. बेस्ट फ्रेंड, बेस्ट साडी पीक चॅलेंज, बेस्ट कपल फोटो चॅलेंज यासह इतर ट्रेंड सध्या सुरू आहेत. हीच संधी साधून अनेकजण महिलांचे, कपलचे हे फोटोज कॉपी करून मोर्फिंग करत आहेत. महिलांचे अश्‍लील फोटोज तयार केले जात आहेत. त्यांची बदनामी करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंगचे प्रकारही होण्याची शक्‍यता आहे, असे सायबर पोलिसांनी सांगितले.  

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्‌सऍप, फेसबुकच्या माध्यमातून अनेकजण आपले वैयक्तिक फोटो स्टेट्‌सला ठेवत आहेत. टाइमपास म्हणून एकमेकांना लाइक करणे, कमेंट करणे ठीक आहे, पण या माध्यमातून काहीतरी चुकीचे घडण्याआधी सर्वांनी सावध व्हायला हवे. विशेषत: महिलांनी सावध राहावे. 
- दीपक पाटील, 
सामाजिक कार्यकर्ते 


सध्या सर्वांना मोकळा वेळ असल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वैयक्तिक फोटो शेअर केले जात आहेत. विशेषत: महिलांचे फोटो एडिट करून नको तिथे वापरले जातात. एरवीही असे प्रकार घडत असतातच. त्यामुळे कोणीही आपले फोटो पब्लिकसाठी ओपन ठेवू नयेत. मैत्र, मैत्रिणी किंवा नातेवाइकांपुरते ठेवावेत. आपले फोटो सुरक्षित राहण्यासाठी स्टेट्‌स टाळलेलेच योग्य. 
- विशेंद्रसिंग बायस, 
पोलिस उपनिरीक्षक, सायबर पोलिस ठाणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus: एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? निधी देण्यास सरकारचा नकार, नेमकं कारण काय?

Beed : गोदावरीत ६० जणांसह बोट उलटली, २० भाविकांना बाहेर काढलं; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

PMC Bomb Threat : पुणे महापौर कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, शहरात खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Video : हॉस्पिटलमधून बाहेर पडताना ढसाढसा रडला सलमान ; जवळच्या मैत्रिणीचं झालं निधन

Latest Marathi News Live Update : पुण्यात बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून पालिका इमारतीचा तपास पूर्ण

SCROLL FOR NEXT