Solapur Heat Wave  Sakal
सोलापूर

Solapur Heat Wave : पशुधनालाही उष्माघाताचा धोका; सावलीत बांधा, पुरेसे पाणी देण्याची गरज

जनावरांसाठी वेळोवेळी पाण्याची व्यवस्था करून सावलीत बांधावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील तापमानाने ४३ अशांचा टप्पा ओलांडला आहे. या उन्हाचा त्रास मनुष्याला जसा होतो आळे, तसा मुक्या जनावरांनाही त्याचा त्रास होतो. त्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. त्यामुळे जनावरांसाठी वेळोवेळी पाण्याची व्यवस्था करून सावलीत बांधावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जिल्ह्यात १२ लाखांहून अधिक मोठी जनावरे आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान सतत ४० अंशापार आहे. त्यामुळे जनावरांनाही धोका वाढला आहे. विशेषतः दुभत्या जनावरांना याचा धोका आहे. कडक उन्हापासून पशुंचा बचाव करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. जिल्ह्यातील तापमान ४३ अंशांपर्यंत पोचले आहे.

उन्हाच्या झळा वाहत आहेत. त्यामुळे पशूंच्या शरीराचे तापमानही संतुलित ठेवण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेतली पाहिजे. पशूंना ऐन दुपारच्या वेळी मोकळे सोडणे किंवा त्यांना बांधलेल्या ठिकाणी उन्हाचा त्रास जाणवणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

पशूंना सावलीत व मोकळ्या परिसरात बांधावे. उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. ९) महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. शीतलकुमार मुकणे यांनीही उष्माघातापासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व पशुसंवर्धन उपायुक्तांना दिल्या आहेत.

उच्च तापमानामुळे पशुधनावर होणारा परिणाम

  • शरीर व चयापचय प्रक्रियेत बदल घडून येतो.

  • शरीराचे तापमान वाढल्याने रक्तप्रवाहावर परिणाम होतो.

  • कमी खाद्य खातात व पाणी अधिक पिण्याचे प्रमाण वाढते.

  • प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

  • स्त्रीबीज व माजाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

  • गर्भधारणेचे प्रमाण कमी होते.

उष्णतेच्या तणावाची लक्षणे

थकवा येणे, जास्त श्वासोच्छ्वासाची गरज भासणे, आळस येणे, लाळ गाळणे, हृदयाचे ठोके वाढणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. पशुधनात ही लक्षणे आढळल्यास तत्काळ पशुवैद्यकीय उपचार करावेत.

उन्हापासून सुरक्षेसाठी उपाययोजना

पुरेसा निवारा ः पशुधन दिवसभर सावली असलेल्या भागात राहतील, यासाठी निवाऱ्याची सोय करावी. नैसर्गिक सावली उपलब्ध व्हावी, यासाठी निवाऱ्याभोवती वृक्षारोपण करावे.

पिण्यासाठी मुबलक पाण्याची सोय ः जनावरांचा उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी शरिरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे ही गुरुकिल्ली आहे. सहजगत्या पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, तसेच जनावरांना पुरेशा प्रमाणात व नियमित स्वच्छ पाणी द्यावे.

जिल्ह्यात सातत्याने तापमान वाढते आहे. त्यामुळे पशूंना उष्माघाताचा धोका आहे. वाढत्या तापमानाचा त्यांच्यावर विपरीत परिणामही होऊ शकतो. पशुधनाच्या उन्हापासून सुरक्षेसाठी पशुपालकांना सूचना दिल्या आहेत. पशूधन सावलीत बांधून वेळोवेळी पाणी द्यावे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून उपचार करावेत.

- समीर बोरकर, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT