Government Servent 
सोलापूर

लॉकडाउनमध्ये गैरहजर राहिल्यास सेवेतून बडतर्फ! कोणी दिला इशारा? वाचा 

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका हद्दीत 16 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून कडक संचारबंदी लागू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने नियुक्‍त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहणे बंधनकारक आहे. गैरहजर राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर आवश्‍यकतेनुसार बडतर्फही करण्याचा इशारा महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिला आहे. 

लॉकडाउनची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याच्या हेतूने महापालिकेतर्फे अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यामध्ये 400 लॉकडाउन असिस्टंट (वर्ग 3) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच लॉकडाउन निरीक्षक (वर्ग 1), लॉकडाउन क्षेत्रीय अधिकारी (वर्ग 2) आणि लॉकडाउन पर्यवेक्षक (वर्ग 2) प्रत्येकी 26 जणांची नियुक्‍ती केली आहे. या सर्वांना नियुक्‍तीचे आदेश त्यांच्या व्हॉट्‌सऍप, ई-मेल व मेसेजद्वारे पाठवण्यात आले आहेत. 

या सर्वांना महापालिकेतील यशवंतराव सभागृह, हुतात्मा स्मृती मंदिर आणि महापालिका परिसरातील आवारामध्ये उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच आवश्‍यकतेनुसार सेवेतून बडतर्फही करण्याचा इशारा आयुक्‍तांनी दिला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT