case filed against husband wife abetment to suicide and as per moneylending act solapur crime sakal
सोलापूर

Solapur Crime : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी व सावकारी अधिनियमा प्रमाणे पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल

पतीला व्याजाने दिलेल्या पैशात जमीन खरेदी देऊनही आणखी पैसे तुमच्याकडे फिरतात असा तगादा लावत तुमच्यावर अफरातफरीचा व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

राजकुमार शहा

मोहोळ : पतीला व्याजाने दिलेल्या पैशात जमीन खरेदी देऊनही आणखी पैसे तुमच्याकडे फिरतात असा तगादा लावत तुमच्यावर अफरातफरीचा व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिल्याने पतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ता 29 ऑगष्ट रोजी घडली होती. या बाबत बुधवार ता 20 रोजी मोहोळ पोलिसात पती-पत्नी विरोधात आत्महतेस प्रवृत्त करणे व सावकारी करणे या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

नितीन भास्कर आतकरे असे आत्महत्या केलेल्या चे नाव आहे. तर रामचंद्र धोंडीबा चंदनशिवे व रोहिणी रामचंद्र चंदनशिवे दोघे रा इस बावी ता पंढरपूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत नितीन आतकरे यांनी चंदनशिवे पती-पत्नीकडून काही पैसे व्याजाने घेतले होते. त्या पैशासाठी ते पती-पत्नी नेहमी माझ्या पतीला त्रास देत होते. मृत नितीन आतकरे हे एका पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

पैसे परत न केल्यास पंपावर अफरातफर केली म्हणून व अॅट्रासिटी चा गुन्हा दाखल करू अशी वारंवार धमकी देत होते. तुम्हाला यातून सुटावयाचे असेल तर तुमच्या नावावरील जमीन मला खरेदी द्या असा तगादा चंदनशिवे पती-पत्नीने लावला होता. आतकरे यांनी ता 23 ऑगष्ट रोजी जमीन ही खरेदी करून दिली.

जमीन खरेदी देऊनही आणखी पैसे तुमच्याकडे फिरतात त्यामुळे तुमच्या नावावर असलेली आणखी जमीन खरेदी द्या, असा तगादा लावल्याने 29 ऑगस्ट रोजी नितीन आतकरे यांनी सकाळी साडेसात वाजण्यापूर्वी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोठारी पाईप या कंपनी जवळ विष प्राशन करून आत्महत्या केली.

पतीच्या आत्महत्येस चंदनशिवे पती-पत्नी हेच जबाबदार असल्याची फिर्याद मृत नितीन आतकरे यांची पत्नी अस्मिता आतकरे रा मोहोळ यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक झालटे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT