Crime 
सोलापूर

केळी काढण्यासाठी परराज्यातून "येथे' विनापरवाना आले; 37 जणांवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : पश्‍चिम बंगालमधून विनापरवाना केळी काढण्याच्या कामासाठी 33 कामगारांना केंद्र (ता. करमाळा) येथे आणल्याप्रकरणी कंदर येथील चार केळी व्यापाऱ्यांसह 37 जणांविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कंदरचे पोलिस पाटील धन्यकुमार सुरेश सुरवसे यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

गेल्या चार दिवसांत करमाळा तालुक्‍यात चार कोनोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पश्‍चिम बंगालमधून 35 कामगार घेऊन आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रमोद प्रकाश वागज, धनाजी सहदेव शिंदे, मुबारक मैन्नुदीन शेख, महादेव बाबूराव मंगवडे (सर्व रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर), रहेमान आली (वय 27, रा. दुलाबत्ती तोला, इनायतपूर), इस्माईल सिराज उल शेख (वय 25, रा. कुरबानी तोला), नसिरुद्दीन शेख खाईज (वय 20, रा. कुरबानी तोला), इजाबुल शेख (वय 26), नसीदूर रहमन शेखमोती (वय 21), पिंकू शेख, तोफाजील शेख (वय 21), पतली असमुद्दीन शेख (वय 29), असीदुल शेख सत्तार शेख (वय 35), आलमगीर शेख, सिराजुल शेख, रोबीउल शेख, मेघू शेख, नौशाद शेख, मोहम्मद निजामुद्दीन शेख (वय 19), रानामुल शेख, गाहुल शेख (वय 35), महंमद जहर अलम महंमद सेफरूद्दीन (वय 26), अजिबुल इस्माईल इनामुल हक (वय 18), मुज्जमील हक इस्माईल शेख (वय 21), हजरत अली गुलमोहम्मद शेख (वय 21), लासारीक शेख, रमजानी शेख (वय 20), एसके तालाबुर मोहंमद अली शेख (वय 51), दालीब रबीउल (वय 18), नूर इस्माईल नोमन शेख (वय 22), शेख रहीम सेताब अली (वय 32), रामडी राकेश हुसेन टुनू शेख (वय 18), साहीदुल इस्माईल कासीम शेख (वय 18), नईम शेख झाटु (वय 18), राजू शेख सुलू रदी शेख (वय 30), साफीक उल इस्माईल मुजीबूर शेख (वय 31), अन्सार उल हक साबेद अली (वय 18), मोहमद नेहरूल मुतालीफ शेख (वय 25), मोरफोन अली एम दुल (वय 19), अंजरूल हक अनिसूर रहमान (वय 18), जहांगीर आलम अलीसुकुरदी (वय 20), रेहमतअली तोहीबअली (वय 19), रॉयल शेख अकबर अली (वय 20). हे सर्व कामगार पश्‍चिम बंगाल राज्यातील आहेत. 

वरील 33 लोकांना पश्‍चिम बंगालमधून विनापरवाना, विनापास कंदरला आणून कोरोनाबाबत शासनाने दिलेल्या कायदेशीर आदेशांचे उल्लंघन केले आहे. कोणत्याही सबळ कारणाशिवाय अवहेलना करून स्वत:च्या व समाजातील इतर लोकांच्या जीवितेला गंभीर धोका निर्माण केला असल्याने त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली आहे. 

करमाळ्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे म्हणाले, करमाळा तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना बाहेर गावाहून कोणीही विनापरवाना, विनापास प्रवेश करू नये. असे कोणी विनापरवाना तालुक्‍यात आल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस पाटलांना सूचना करण्यात आल्या आहेत. परजिल्ह्यातून, परराज्यातून कोणी आल्यास माहिती कळवावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT