Crime 
सोलापूर

ब्रेकिंग..! सोयाबीनच्या निकृष्ट बियाणांची विक्री; औरंगाबादच्या कंपनीविरोधात बार्शी तालुक्‍यात गुन्हा 

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : सोयाबीन पिकाचे निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना पुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील ग्रीन गोल्ड सीड्‌स प्रा. लि. या कंपनीविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी पंचायत समितीचे गुणवत्ता निरीक्षक तथा कृषी अधिकारी भारत दगडू कदम यांनी वैराग पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बार्शी तालुक्‍यात ग्रीन गोल्ड सीड्‌स प्रा. लि., औरंगाबाद या कंपनीने मोठ्या प्रमाणात खरीप हंगाम 2020-21 मध्ये सोयाबीन बियाणांचा पुरवठा केला आहे. तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीच्या सदस्यांनी 59 शेतकऱ्यांच्या तक्रारींचा स्थळ निरीक्षण पंचनामा केला होता. यामध्ये ग्रीन गोल्ड कंपनीचे सोयाबीन वाण जे एस 335 ची पेरणी केली. त्याची निर्धारित उगवण क्षमता कमी आली. 

हेही वाचा : "या' माजी आमदाराने दिला इशारा : पुन्हा लॉकडाउन लादाल तर खबरदार..! 

यानुसार झाला गुन्हा दाखल 

महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक बियाणे 2010 / CR (1) A बियाणे अधिनियम 1966 मधील खंड 13 मधील खंड -1 आणि बियाणे नियम 1968 मधील नियम -22 नुसार बियाणे हे निर्धारित उगवण क्षमता कमीतकमी 65 टक्के येणे अपेक्षित होते. परंतु बियाणांची उगवण क्षमता 65 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. या कंपनीचे बियाणे उगवले नसल्याच्या 59 शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. याबाबत कृषी विभागाने स्थळ पाहणी करून पंचनामे केले होते. या बियाणांची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर त्यांची उत्पादन क्षमता कमी आढळून आली. गुणवत्ता नसलेले निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे पुरवठा व वितरण करून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापक भाऊसाहेब रामराव तुपे (रा. गट नं. 65, नारायणपूर, वाळूज (खुर्द), ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निकृष्ट बियाणे वितरण करून पिकांचे नुकसान व आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद दाखल झाल्याने वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मराठवाडा, विदर्भ भागानंतर अशा प्रकारचा पहिला गुन्हा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

Pune Crime : बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक; आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार प्रवाहची नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'चा प्रोमो समोर; ईशा केसकर नाही 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

Navi Mumbai: पोलिसांचा गुन्हेगारांना दे धक्का! अवैध कारभाराविरुद्ध १४ आरोपींवर गुन्हे दाखल; घणसोलीत धडक कारवाई

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

SCROLL FOR NEXT